Ladki Bahin Yojna: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेंतर्गत रविवारी नांदेडमध्ये महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी असलेल्या ५३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, ही महिला भांगी येथील रहिवासी होती. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात रविवारी महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण जिल्ह्यातील महिला कार्यक्रमाला पोहोचल्या होत्या. या कार्यक्रमाला नांदेडच्या भांगी गावातील 50 हून अधिक महिलाही आल्या होत्या. महिलांना सकाळी 10 वाजताची वेळ देण्यात आली होती.
मात्र कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता सुरू झाला....रविवारी खूप ऊन होते. पिण्यासाठीही पाणी उपलब्ध नव्हते. महिलांची गर्दी आणि उन्हामुळे शांताबाईंना त्रास होऊ लागला. अचानक महिलेला छातीत दुखू लागले आणि चक्कर आल्याने ती खाली पडली.
परिषदेत उपस्थित असलेल्या आरोग्य पथकाकडे महिलेला नेण्यात आले. महिलेवर प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र तेथे महिलेचा मृत्यू झाला.