महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या कोयासन विद्यापीठाने (Koyasan University, Japan) मानद डॉक्टरेट (Doctorate) पदवी दिली आहे. हा पदवी प्रदान सोहळा मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात पार पडला असून कोयासन कडून डॉक्टरेट मिळवणारे देवेंद्र फडणवीस हे पहिलेच भारतीय आहेत. पायाभूत सुविधा, औद्याोगिक विकास, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले कार्य यासाठी फडणवीसांचा डॉक्टरेट पदवी देऊन पुरस्कार करण्यात आला आहे.
कोयासन विद्यापीठाचे प्रा. इन्युई रुनिन, वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक यामाशिता योशियो, जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत डॉ. फुकाहोरी यासुकाता यांनी आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावत फडणवीसांना डॉक्टरेट ही पदवी प्रदान केली आहे. कोयासन विद्यापीठाने पहिल्यांदाच 120 वर्षांच्या इतिहासात मानद डॉक्टरेट पदवी देण्याचा निर्णय घेतला आहे. नक्की वाचा: देवेंद्र फडणवीस यांनी घेतली जपानचे आर्थिक, व्यापार आणि उद्योग मंत्री Yasutoshi Nishimura यांची भेट; महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांबाबत सकारात्मक चर्चा .
पहा सोहळा
Humbled🙏🏽
🎓 Convocation ceremony to confer ‘Doctorate’ by the Koyasan University, Japan
🎓 कोयासन विद्यापीठ, जपान तर्फे ‘मानद डॉक्टरेट’ प्रदान करण्यास दीक्षांत समारंभ@KoyasanUniv @IndianEmbTokyo#Mumbai #Maharashtra #Japan #IndiaJapan #KoyasanUniversity https://t.co/V0Dh9pe0L4
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 26, 2023
देवेंद्र फडणवीस ऑगस्ट महिन्यात जपान दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात फडणवीस यांनी कोयासन विद्यापीठाला भेट दिली होती. तेव्हा डीन सोएदा सॅन यांनी फडणवीस यांना डॉक्टरेट देण्याचे जाहीर केले होते.