पुण्यामध्ये आगामी गणेशोत्सवाच्या तोंडावर एका मंडळाला अफजल वधाचा देखावा साकारण्यास पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद पहायला मिळाले होते. मात्र आता सार्याच स्तरातून यावर टीका होत असताना अखेर कोथरूड पोलिसांनी (Kothrud Police) अफजल खान वध (Afzal Khan’s killing scene) देखावा ला परवानगी दिली आहे. त्याबाबतच्या लेखी परवानगी पत्रामध्ये पोलिसांनी गणेशोत्सवाचा अनुषंगाने दिलेल्या परवानगीचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन देखील केले आहे.
पुण्यात संगम मित्र मंडळाने अफजल खानाचा वध देखावा साकरण्यासाठी काही दिवसांपूर्वी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. परंतू यामुळे कायदा व सुवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो असे सांगत ती नाकारण्यात आली होती. त्यानंतर मंडळाचे अध्यक्ष आणि मनसे नेते किशोर शिंदे यांनी परवानगी दिली नाही तर कोर्टात जाण्याचा इशारा देण्यात आला होता.
संगम तरुण मंडळ मागील 56 वर्ष सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करत आहे. ऐतिहासिक देखावे साकारण्यासाठी संगम तरुण मंडळ प्रसिद्ध आहे. हे देखील नक्की वाचा: Mumbai Crime: गणपती मिरवणूकीत राडा करणाऱ्यास अटक, पुढील तपास सुरु .
यंदा कोविड 19 चं संकट थोडं आटोक्यात आल्याची चिन्हं असताना निर्बंधांशिवाय दणक्यात सण साजरा करण्यास मुभा आहे. त्यामुळे पुण्यातही सार्वजनिक मंडळं यंदा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी तयार आहेत.