Nair Hospital | X

कोलकाता मधील RG Kar Medical College and Hospital मध्ये एका पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनी डॉक्टर वर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याच्या निषेधार्थ आज (13 ऑगस्ट) The Federation of All India Medical Association अर्थात FAIMA कडून ओपीडी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. देशपातळीवर प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स एकत्र आले आहेत. आजपासून त्यांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे तपासामध्ये दिरंगाई होत असल्याचा त्यांचा आरोप आहे.

महाराष्ट्रातही आज कोलकाता मधील घटनेचा निषेध करण्यासाठी एकत्र आले आहेत. मुंबईच्या नायर हॉस्पिटल मध्ये तर नागपूर मधील Govt Medical College & Hospital मधील डॉक्टर विद्यार्थी रस्त्यावर आले आहेत. नक्की वाचा: Kolkata Rape Case: '...अन्यथा डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवू'- ममता बॅनर्जी. 

महाराष्ट्रातही निदर्शनं

पोलिस तपासाकडे लक्ष

पोलिस अधिका-यांनी या प्रकरणाशी संबंधित अनेक डॉक्टर आणि अन्य व्यक्तींची चौकशी सुरू केली आहे. अधिकाऱ्यांनी एका सहाय्यक प्राध्यापकालाही बोलावून घेतले ज्याने पीडितेच्या पालकांना तिच्या मृत्यूची माहिती दिली. सध्या देशभर निदर्शनं सुरू असल्याने आणि डॉक्टरांनी त्वरीत न्याय देण्याची मागणी केल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. आंदोलक ज्युनियर डॉक्टरांनी मंगळवारी कोलकाता पोलिसांना त्यांचा तपास पूर्ण करण्यासाठी 14 ऑगस्टची मुदत दिली आहे.