Panchaganga River:  पोटच्या 5 वर्षाच्या मुलाला नदीत फेकल्याप्रकरणी जन्मदात्या पित्याला अटक; कारण ऐकून पोलिसही चक्रावले
Crime Scene | Representational Image | (Photo Credits: PTI)

कोल्हापूरच्या (Kolhapur) इचलकरंजी (Ichalkaranji) येथून सर्वांना हादरून टाकणारी माहिती समोर आली आहे. जन्मदात्या पित्यानेच पोटच्या पाच वर्षाच्या मुलीला पंचगंगा नदीत (Panchaganga River) फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी (Shivajinagar Police) आरोपीला अटक केली आहे. आपल्या मुलावर उपचार करण्यासाठी पैसे नसल्यामुळे आरोपीने असे धक्कादायक कृत्य केल्याची कबूली दिली आहे. या घटनेतील मुलगा अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सिंकदर हुसेन (वय, 48) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सिकंदर हा मोलमजुरीचे काम करतो. शिवाय सिकंदर स्वत: दिव्यांग असून त्याला एक दहा वर्षाची मुलगी आणि अफान हुसेन अशी दोन मुले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अफानला फिट्स येण्याचा आजार आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने औषधोपचाराच्या खर्चाच्या कारणावरून त्यांच्या घरी सतत वाद होत असत. याच वादातून संध्याकाळी संतापाच्या भरात मुलाला उपचारांसाठी नेतो असे सांगून सिकंदर 5 वर्षांच्या अफानला घेऊन गेला आणि त्याला पंचगंगा नदीत फेकून दिले. हे देखील वाचा- Flood in Maharashtra: मराठवाडा, विदर्भा मध्ये ओला दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत मिळणं गरजेचे; देवेंद्र फडणवीस यांची मागणी

दरम्यान, याच दिवशी रात्री उशीरा घरी परतलेल्या सिंकदरने अफानला नदीत फेकून दिल्याचे त्याच्या कुटुंबियाला सांगितले. त्यानंतर सिंकदर विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, याच परिसरात गेल्या 2 महिन्यांत घडलेली ही तिसरी घटना आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. या संदर्भात लोकसत्ताने वृत्त दिले आहे.