Kolhapur Gram Panchayat Elections 2022 : कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी 28 नोव्हेंबर पासून सुरू; 475 गावांना थेट जनतेतून मिळणार सरपंच
Election | (Photo Credit - Twitter)

कोल्हापूर (Kolhapur ) मध्ये 475 ग्रामापंचायतींच्या निवडणूकांची (Gram Panchayat Elections) धामधूम उद्या अर्थात 28 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. या निवडणूकीसाठी 18 डिसेंबरला मतदान तर 20 डिसेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच 7 हजारपेक्षा जास्ट लोकांमधून आता सरपंच (Sarpanch) निवडला जाणार आहे. यामुळे दोन वर्षांनंतर येणार्‍या विधानसभेसाठी देखील मोर्चेबांधणी या निवडणूकांच्या निकालांवर केली जाणार आहे. ग्रामपंचायती मध्ये निवडणूक स्थानिक पातळी वर होत असली तरीही आघाड्या नेत्यांच्या मार्गदर्शनातून होत असल्याने आता त्यांनाही महत्त्व आलं आहे. सरपंच निवडणूक थेट जनतेतून होणार असल्याने उमेदवारी देताना नेत्यांची परीक्षाच आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तालुकानिहाय तहसिलदारांकडून अधिसूचना जारी झाल्यानंतर आता 28 नोव्हेंबर पासून अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत उमेदवार अर्ज दाखल करू शकणार आहेत. नंतर 5 डिसेंबरला अर्जांची छाननी, 7 डिसेंबरला चिन्हं वाटप होणार आहे. नक्की वाचा: Maharashtra Assembly Monsoon Session: नगराध्यक्ष आणि सरपंच पदाची थेट निवडणूक घेण्याचं विधेयक मागे घेण्याची विरोधकांची मागणी .

ग्रामपंचायतीच्या निवडणूका सुरळीत पार पडण्यासाठी 12 हजार कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. 475 गावांतील 1977 मतदान केंद्रावर मतदान पार पडेल. या ठिकाणी ईव्हिएम सुसज्ज स्थितीत ठेवले जातील.