Kolhapur Cyber Chowk Accident: कोल्हापूर सायबर चौक मध्ये भीषण अपघात; भरधाव कारने दुचाकींना उडवले, 3 ठार
Kolhapur Accident | X

कोल्हापूर (Kolhapur) मध्ये सायबर चौकात (Cyber Chowk) एक मोठा अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या कार ने चौघांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 3 जण गंभीर जखमी झाली आहेत तर  तिघांचा  जागीच मृत्यू झाला आहे. कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. कारने समोरच्या दुचाकीस्वारांना उडवल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान जखमी लोकांना नजिकच्या सीटी हॉस्पिटल आणि सीपीआर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. राजारामपुरी आणि शिवाजी विद्यापीठ, राजाराम कॉलेजला जोडणारा सायबर चौक हा गजबजलेला भाग आहे. राजारामपुरीकडून आलेल्या सॅण्ट्रो  भरधाव कारने अनेकांना धडक दिल्याचं समोर आलं आहे. त्यामध्ये टू व्हीलरवरील दोन-तीन जण हवेत उडाल्याचं दिसून आलं आहे. नंतर ही कार पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला आदळल्याचं दिसलं आहे. Pune Accident: पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरण ताज असतानाच, अज्ञात कारची आणखी एकाला धडक (Watch Video). 

हा अपघात दुपारी अडीजच्या सुमारास झाला आहे. 72 वर्षीय चालक मृत झाले आहेत. घटनास्थळी स्थानिक पोलिस आणि वाहतूक विभागाचे अधिकारी पोहचले आहेत. अपघातग्रस्त वाहनं पोलिस स्टेशन मध्ये नेण्यात आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कार चालकाच्या कुटुंबाची चौकशी सुरू आहे. चालकाला काही आजार होता का? त्याचं गाडीवरील नियंत्रण का सुटलं याचा तपास सुरू आहे.