Kirit Somaiya on Sanjay Raut: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे एकमेकांवर आरोप करण्याचे सत्र चालूचं आहे. आता पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या यांनी संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांवर 100 कोटींच्या जंबो कोविड केअर सेंटर घोटाळ्याचा आरोप केला आहे.
किरीट सौमय्या यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाकडे चौकशी आणि तक्रार करण्याची मागणी केली. संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ही नोकरी मिळवल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. लाइफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस नावाने भागीदारी फर्म स्थापन केल्याचा दावा खोटा असल्याचा आरोप त्यांनी राऊत यांच्यावर केला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे तक्रार केली असून चौकशीची मागणीही केली आहे. (वाचा - Mumbai: ट्राफिक जाममुळे मुंबईतील नागरिकांना परिवाराला वेळ न देण्यासह 3 टक्के घटस्फोट होतात- अमृता फडवणीस (Watch Video))
याआधीही किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर वाईन कंपनीत भागीदारी केल्याचा आरोप केला होता. राऊत यांची महाराष्ट्रातील बडे उद्योगपती अशोक गर्ग यांच्या मॅग्पी ग्लोबल लिमिटेड या वाईन कंपनीत भागीदारी असल्याचे सोमय्या यांनी सांगितले होते. या व्यवसायात त्यांची मोठी गुंतवणूक आहे. संजय राऊत यांच्या दोन्ही मुली आणि पत्नी या कंपनीत संचालक पदावर आहेत. वाइन व्यवसायात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्यामुळे मॉल्स आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विकण्याच्या निर्णयाला संजय राऊत समर्थन देत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.
सोमय्या यांच्या आरोपांना राऊत यांनी दिले प्रतिउत्तर -
किरीट सोमय्या यांच्या आरोपांना राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. राऊत म्हणाले होते, किरीट सोमय्या यांची मुले हरभरा विकतात का? अमित शहांची मुले केळी विकतात? डान्सबार उघडून भाजप नेत्यांची मुले बसली आहेत? माझा काही वायनरी व्यवसाय असेल तर भाजप नेत्यांनी तो ताब्यात घेऊन चालवावा. माझ्या मुली एखाद्या कंपनीत डायरेक्टर असतील तर काय चुकले. भाजप नेत्याच्या मुलासारखे ते अंमली पदार्थांचा व्यवसायात नाहीत.