Kharghar Heat Stroke: खारघर उष्माघात प्रकरणी गौप्यस्फोट; मृतांच्या शवविच्छेदन अहवालात पुढे आली धक्कादायक माहिती; घ्या जाणून
Maharashtra Bhushan,Navi Mumbai (Image Credit - Twitter)

अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पूरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान सोहळ्यात नवी मुंबई (Navi Mumbai) येथील खारघर (kharghar heat stroke) येथे घडलेल्या दुर्घटनेबद्दल धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या सोहळ्यात उष्माघाताने झालेल्या 14 जणांच्या मृत्यूपैकी तब्बल 12 जणांनी सहा ते सात तासांपासून काहीच खाल्ले नव्हते. मृतांच्या शवविच्छेदन अहवालात ही माहिती पुढे आली आहे. उर्वरीत मृतांनी मृत्यूपूर्वी काही खाल्ले होते किंवा नाही याबद्दल पुरेशी माहिती पुढे आली नाही. या कार्यक्रमात अत्यावस्त झालेल्यांपैकी सात जण रुग्णालयात अद्यापही उपचार घेत आहेत.

खारघर दुर्घटनेवरुन राजकारण जोरदार तापले आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तात, खारघर दुर्घटनेतील मृतांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांचा हवाला देण्यात आला आहे. या डॉक्टरांच्या हवाल्याने या वृत्तात म्हटले आहे की, यातील काही मृतांना आगोदरपासूनच काही शारीरिक व्याधी होत्या. ज्यामुळे त्यांची प्रकृती आगोदरच नाजूक होती. दुसऱ्या बाजूला प्रचंड उन्हामुळे त्यांना त्रास झाला. उन्हात बसलेल्या या लोकांना जरी अन्न-पाणी दिले असते तरीही काही फरक पडला नसता. त्यांना तळपत्या उन्हात सावलीची गरज होती.

दुसऱ्या बाजूला असेही सांगिते जात आहे की, महाराष्ट्र भूषन कार्यक्रमाच्या नियोजीत वेळेपूर्वी आवश्यक नियोजन करण्यासाठी पनवेल जिल्हा प्रशासनाचे एक पथक पाहणीसाठी गेले होते. या वेळी मैदानावरील उन्हाचा या अधिकाऱ्यांनाही त्रास जाणवत होता. मात्र, त्यांनी ही बाब त्यांच्या वरीष्ठांपर्यंत पोहोचवलीच नाही. त्यामुळेही व्यवस्थापनात त्रूटी राहिल्या. (हेही वाचा, महाराष्ट्र भूषण सोहळा, Heat Stroke पीडितांची उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्याकडून रुग्णालयात भेट; मृतांच आकडा 11 वर पोहोचला)

ट्विट

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात की, अनेकदा उष्माघातामुळे नागरिकांच्या जीवावर बेतते. तापमान वाढले की शरीरातील पाणी कमी होते. त्यासाठी शरीराला सावली आणि पाणी मीळणे आवश्यक आहे. जर शरीराती पाणी कमी झाले तर त्याचा रक्तातील प्रथिनांवर परिणाम होतो.