Maharashtra Bhushan Award: महाराष्ट्र भूषण सोहळा, Heat Stroke पीडितांची उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्याकडून रुग्णालयात भेट; मृतांच आकडा 11 वर पोहोचला
Uddhav Thackeray, Ajit Pawar | (Image Credit - ANI Twitter)

महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) सोहळा प्रदान करण्यासाठी आयजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उष्माघाताने (Ushmaghat) दगावलेल्या मृतांची संख्या 11 वर पोहोचली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरद्वारे दिली. दरम्यान, हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या काही उष्माघात (Heat Stroke) पीडित रुग्णांवर (श्रीसेवक) नवी मुंबई येथील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या रुग्णांची उद्धव ठाकरे आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारसोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही जोरदार निषाणा साधला. ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पूरस्कार प्रदान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबईतील खारघर येथे करण्यात आले होते.

उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ''आम्ही उपचार घेत असलेल्या लोकांना भेटलो. 4-5 जणांशी संवाद साधला, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. कार्यक्रमाचे योग्य नियोजन केले नव्हते. या घटनेची चौकशी कोण करणार? कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत ढिसाळपणे करण्यात आले होते. कदाचित केंद्रीय मंत्री अमित शाह यांनाच लवकर निघायचे होते आणि त्यांची इतर दुसरी वेळ मिळत नसावी, त्यामुळेच कार्यक्रमाचे नियोजन इतक्या ढिसाळ आणि घाईघाईत करण्यात आले असावे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. (हेही वाचा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला जीवघेणे वळण, खारघरमध्ये 13 जणांचा मृत्यू, 600 हून अधिक लोकांना उष्माघात)

ट्विट

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, आम्ही पाहिले की एक रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. बाकीचे आमच्याशी बोलले. मात्र, ही एक अतिशय गंभीर घटना आहे... याची चौकशी झालीच पाहिजे.

ट्विट

नवी मुंबईतील खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने 11 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जणांवर उपचार सुरू आहेत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एमजीएम कामोठे रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद साधला, परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

थोडक्यात

ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण देणाऱ्या श्री समर्थ विद्या मंदिर या शाळेचे आप्पासाहेब धर्माधिकारी हे संस्थापक होते. त्यांनी श्री समर्थ कृषी विद्या केंद्र ही कृषी संस्था स्थापन केली जी शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्राचे प्रशिक्षण देते.