New Chief Justice Of Bombay HC: दुपारी राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांनी न्यायमूर्ती उपाध्याय (Justice Devendra Kumar Upadhyay) यांना शपथ दिली. न्यायमूर्ती उपाध्याय हे मुंबई उच्च न्यायालयाचे ( Bombay High Court) मुख्य न्यायाधीश (CJ) म्हणून पदोन्नती होण्यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश होते. 21 नोव्हेंबर 2011 रोजी त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
न्यायमूर्ती उपाध्याय यांचा जन्म 16 जून 1965 रोजी झाला. त्यांनी 1991 मध्ये लखनौ विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली. न्यायमूर्ती उपाध्याय यांच्या नावाची शिफारस भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने 6 जुलै रोजी केली होती. राष्ट्रपतींनी त्यांची 24 जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली होती. (हेही वाचा - Bengaluru-Mumbai Flight: बेंगळुरूहून मुंबईला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये महिला प्रवाशासोबत गैरवर्तन; पुरुष प्रवाशाने अनुचित स्पर्श केल्याची पीडितेची तक्रार)
New Chief Justice of Bombay High Court Devendra Kumar Upadhyay took oath today at RajBhavan.
Justice Upadhyay was at Allahabad HC before. pic.twitter.com/oAUldvwS0s
— Ms Aflatoon💙 (@Ms_Aflatoon) July 29, 2023
चार दिवसांच्या संक्षिप्त कार्यकाळानंतर 30 मे रोजी मुख्य न्यायाधीश आरडी धानुका निवृत्त झाल्यापासून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे पद रिक्त होते. न्यायमूर्ती नितीन जामदार हे तेव्हापासून मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे, 94 च्या मंजूर संख्याबळाच्या तुलनेत मुंबई उच्च न्यायालय 67 न्यायाधीशांसह कार्य करेल.