Medical | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

दरवर्षी नवनवीन वैद्यकीय महाविद्यालये (Medical Collage) सुरु करण्यात येतात. पण जे आहेत त्याच वैद्यकीय शिक्षण संस्थेच्या कामकाजावर अधिक भर घालण्याची गरज आहे. कारण राज्यभरातील (Maharashtra) विविध महाविद्यालयात आवश्यक तेवढे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ‘एनएमसी’च्या (NMC) तपासणीवेळी वैद्यकीय शिक्षकांची कमतरता भासत असल्याने ‘उसनवारी’ शिक्षक घेण्याची वेळ प्रशासनावर येत आहे आणि हा उसनवारीचा उद्योग कित्येक वर्षांपासून सुरु आहे.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (Government Medical Collage) वैद्यकीय शिक्षकांची तब्बल 1200 पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. थेट अधिष्ठातांपासून अगदी सहाय्यक प्राध्यापकांपर्यंतची पदे रिक्त आहेत.

 

देशात दिवसेनदिवस बेरोजगारांची (Unemployment) संख्या वाढत आहे. सद्य स्थितीत बेरोजगारी (Unemployment) हा देशातील सगळ्यात मोठ्या प्रश्नांपैकी एक आहे. अनेक पद्युत्तर (Graduation) शिक्षण घेतलेले विद्यार्थी नोकरीच्या शोधात आहे. सरकारी नोकरी (Government Job) तर एक स्वप्न असल्याचं भासत पण खासगी नोकऱ्या मिळणं देखील अधिक अवघड झालं आहे. बेरोजगारीची संख्या एवढी जास्त असताना वैद्यकीय विभातील (Medical Department) नोकऱ्याबद्दल राज्यातून धक्कादायक आकडेवारी पुढे आलेली आहे. (हे ही वाचा:- Indian Post Job Recruitment: दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीची संधी, इंडिया पोस्ट कडून मेगाभरतीची घोषणा)

 

मंजूर 23 पैकी 11 अधिष्ठाता, 490 पैकी 168 प्राध्यापक, 1126 पैकी 206 सहयोगी प्राध्यापक व 1765 पैकी 824 सहाय्यक प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याचे समोर येत आहे. तरी  पुन्हा 12 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे नवीन महाविद्यालये सुरू केली जात असताना जुन्या महाविद्यालयांच्या रिक्त पदांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.