महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: जालना जिल्ह्यातील पैठण ते सिल्लोड मतदार संघाचे उमेदवार, महत्त्वाच्या लढती आणि निकाल जाणून घ्या

महाराष्ट्रात (Maharashtra) 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात निवडणुका घेण्यात येईल आणि 24 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. जालना (Jalna) विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ही विधानसभा जालना जिल्हा आणि जालना लोकसभा मतदारसंघांत येते. जालना विधानसभा मतदारसंघातून शिवसेना तीन वेळा आणि कॉंग्रेसचे नेते दोन वेळा निवडून आले आहेत. 2014 मध्ये शिवसेनेचे अर्जुन खोतकर विजयी झाले होते. भारतीय जनता पक्षाचे खासदार रावसाहेब पाटील दानवे हे या लोकसभा मतदारसंघातील आहेत. या मतदारसंगाच्या इतिहासाबद्दल सांगायचे झाले तर जालना पूर्वी हैदराबाद राज्याचा भाग होता. 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर हा औरंगाबाद जिल्ह्याचा भाग बनला. जालना विधानसभा मतदारसंघात अल्पसंख्यक आणि मागासवर्गीय मतदारांचे शहरी भागात प्राबल्य आहे. जालना संसदीय मतदारसंघात 6 विधानसभा जागांचा समावेश असून पैठण आणि जालना या जागेवर शिवसेनेचा कब्जा आहे. तर बदनापूर, भोकरदन, फुलंब्री विधानसभा जागा आणि सिल्लोडमध्ये कॉंग्रेसचे आमदार आहेत.

जालना विधानसभा मतदारसंघ

जालना विधानसभा जागा ही महाराष्ट्रातील महत्त्वाची विधानसभा जागा आहे.  यंदा जालना विधानसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाकडून निकाल लागणार हे जनतेला ठरवायचे आहे. 2014 मध्ये खोतारांनी कॉंग्रेसच्या उमेदवाराला अगदी अटीतटीच्या स्पर्धेत केवळ 261 मतांनी पराभूत केले होते. या जागेवर भाजप, शिवसेना आणि काँग्रेसव्यतिरिक्त बसपाला 36 हजार मतं मिळाली होती. यंदा, भाजप-शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत निवडणूक लढवत असल्या कारणाने यंदाची लढत जोरदार होणार असेल यात शंका नाही. जालना जिल्ह्यात 76.80 टक्के लोक हिंदू धर्माचे आहेत, तर 14 टक्के लोक मुस्लिम आणि 7.79 टक्के बौद्ध आहेत.

विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014

अर्जुन पंडितराव खोतकर, शिवसेना- 45,078

गोरन्याल कैलास किशनराव, काँग्रेस- 44,782अरविंद चव्हाण, भाजप- 37,591अब्दुल रशीद अजीज, बीएसपी- 36,350

रवी हरिभाऊ राऊत, मनसे- 5,500

ठाकूर खुशालसिंग नंदकिशोरसिंग, राष्ट्रवादी- 1,611

जालना विधानसभा मतदार संघातील उमेदवार नावे इथे पाहा

अर्जुन खोतकर, शिवसेना

गोरंट्याल कैलास किसनराव, काँग्रेस

राशिद अब्दुल अजीज, बीएसपी

अण्णासाहेब रामभाऊ चित्तेकर, बहुजन मुक्ती पार्टी

कैलास गंगाधर फुलारी, आम आदमी पार्टी

पैठण विधानसभा मतदारसंघ

पैठण (Paithan) विधानसभा सीट शिवसेनेचा गड आहे. राजकीय इतिहासाबद्दल बोलले तर 1990 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने पाच वेळा या विधानसभा जागेवर विजय मिळवला आहे. फक्त 2009 मध्येच राष्ट्रवादी कॉंग्रेसने सेनेच्या या बालेकिल्ल्यात प्रवेश केला होता. 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेना नेते संदीपानराव भुमरे यांनी येथून विजय मिळविला.2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेना नेते संदीप भुमरे यांनी या जागेवरून विजय मिळविला होता.

विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014

संदीप भूमरे, शिवसेना- 66, 991

संजय यादवराव, राष्ट्रवादी - 41, 952

विनायक लक्ष्मणमी भाजप - 29, 957

पैठण विधानसभा मतदार संघातील उमेदवार नावे इथे पाहा

दत्तात्रय राधाकिसन गोर्डे, राष्ट्रवादी

संदीपनराव भुमरे, शिवसेना

विजय गवळी, बीएसपी

प्रल्हाद धोंडीराम राठोड, एआयएमआयएम

बदनापूर विधानसभा मतदारसंघ

बदनापूर दुसऱ्यांदा ताब्यात ठेवण्यासाठी भाजपचे आमदार नारायण कुचे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघातून 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, लढत कुचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बबलू चौधरी अशी दुहेरी आहे. 2014 मध्ये शिवसेनेच्या ताब्यातून रावसाहेब दानवे यांनी हा मतदार संघ काढून घेतला. पाणी पुरवठ्याची अवस्था भीषण आहे. बदनापूर नगर पंचायतीवर भाजपचा झेंडा आहे. बबलू चौधरी यांनी मागील दहा वर्षात सातत्याने मतदारसंघात चांगला जनसंपर्क निर्माण केला आहे. चौधरी यांना २००९ मध्ये ३६ हजार मतं, ती २०१४ ला बदलून ५० पर्यंत पोहचली. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत चौधरींना मतदारसंघात सहानुभूतीचा फायदा होईल असे चित्र दिसत आहे.

विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014

नारायण कुचे, भाजपा - 73, 560

बबलु चौधरी, राष्ट्रवादी- 44, 782

बदनापूर विधानसभा मतदार संघातील उमेदवार नावे इथे पाहा

नारायण कुचे, भाजप

बबलु चौधरी, राष्ट्रवादी

राजेंद्र मगरे, अपक्ष

राजेंद्र भोसले, मनसे

भोकरदन विधानसभा मतदारसंघ

भोकरदनमधील मागील विधानसभा निवडणुकीकडे पहिले तर ही विधानसभा जागा भाजपाने चार वेळा आणि राष्ट्रवादीने दोनदा जिंकली आहे. 1990 मध्ये भाजपने पहिल्यांदा रावसाहेब दादाराव हे भाजपचे आमदार म्हणून निवडून आले होते. 2014 मध्ये भाजपचे संतोष दानवे आमदार झाले. जालना जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय असतो ते म्हणजे भोकरदन मतदारसंघ. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या अंतर्गत असलेल्या या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. भोकरदन आणि जाफराबाद, या दोन तालुक्यांचा समावेश असलेल्या या मतदार क्षेत्रात 90 टक्के शेतीवर अवलंबून असलेलं मतदार आहेत.

विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014

संतोष दानवे, भाजप- 69,597

चंद्रकांत दानवे, राष्ट्रवादी- 62,847

रमेश गव्हाड, शिवसेना- 36,298

भोकरदन विधानसभा मतदार संघातील उमेदवार नावे इथे पाहा

चंद्रकांत दानवे, राष्ट्रवादी

निवृत्ती बनसोडे, बीएसपी

संतोष दानवे, भाजप

फुलंब्री विधानसभा मतदारसंघ

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे च्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करता तो म्हणजे,फुलंब्री मतदारसंघ. 2009 मध्ये येथून कॉंग्रेसने बाजी मारली, पण 2014 च्या निवडणुकीत फेरबदल झाला आणि भाजप नेते हरिभाऊ बागडे इथून आमदार म्हणून निवडून आले. 2004 आणि 2014 चा अपवाद वगळता बागडे यांनी 1984 पासून या विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहेत. यंदा कोणताही योग्य उमेदवार न मिळाल्याने बागडे या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पण, यंदा भाजपसाठी ही निवडणूक सोप्पी नसेल कारण मागील निवडणुकीत बागडेंनी 3,513 मतांनी विजय मिळवला होता. शिवाय, इच्छूकांना तिकीट न मिळाल्याने वाढणाऱ्या नाराजीचा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014

हरिभाऊ बगडे, भाजप- 73,294

डॉ कल्याण वैजनाथराव काळे, काँग्रेस 69,683

फुलंब्री विधानसभा मतदार संघातील उमेदवार नावे इथे पाहा

अमर देशमुख, मनसे

डॉ कल्याण काळे, काँग्रेस

हरिभाऊ बगडे, भाजपा

सत्यजित साळवे. बीएसपी

सिल्लोड विधानसभा मतदारसंघ

महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघात सिल्लोड विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदार संघाच्या राजनैतिक इतिहासाबद्दल बोलले तर, इथे भाजप आणि काँग्रेस पक्षाची पकड मजबूत आहे. सिल्लोड विधानसभा जागा महाराष्ट्रातील एक महत्वाची विधानसभा जागा आहे. मागील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या 2014 उमेदवाराने विजय मिळविला होता. 2014 मध्ये कॉंग्रेसचे अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांनी भारतीय जनता पक्षाचे सुरेश पांडुरंग यांना 13,921 मतांच्या फरकाने पराभूत केले.

विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014

अब्दुल सत्तर अब्दुल नबी, कांग्रेस- 96,038

सुरेश पंडूरंग, भाजप- 82,117

मीरकपुर सुनील, शिवसेना- 15,909

दीपाली मधुकर, मनसे- 3,465

सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार नावे इथे पाहा

अब्दुल सत्तार अब्दुल नबी, शिवसेना

कैसर आझाद शेख, काँग्रेससंदिप सुरडकर, बीएसपी

दादाराव वानखेडे, अपक्ष

महात्राष्ट्रात हरियाणा समवेत 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. आणि 24 तारखेला मतमोजणी होईल. यंदाच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात थेट लढत पाह्यला मिळणार आहे.