Jalgaon Bus Accident: महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात एका खासगी बसचा सकाळच्या सुमारास अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. जिल्ह्यातीस एरंडोल तालुक्यात बसचा भीषण अपघात झाला. हा अपघात दुभाजकला धडकून झाल्याची माहिती मिळाली आहे. यात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले आहे. जखमी लोकांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. या धडकेत बस पलटली आहे. बसचा काही भाग हा संपुर्ण चक्काचूर झाला आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील पिंपळ कोठा गावाजवळ मुंबई नागपूर महामार्गावर खासगी बसचा अपघात झाला. वाहन चालकाला वळणाचा अंदाजा न आल्याने हा अपघात झालाआहे. बस दुभाजकावर आदळून थेट पुलावरून खाली कोसळली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर चार प्रवासी गंभीर जखमी झाले. आणि काही प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या. जखमीवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहे. सकाळी नऊच्या दरम्यान हा अपघात झाला.
पोलीसांना या अपघाताची माहिती देताच घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांनी या अपघाताची नोंद घेतली. पोलीसांच्या आणि स्थानिकांच्या मदतीने जखमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या भीषण अपघातात बसचा संपुर्ण नुकसान झाले आहे..