Jalgaon Crime: महाराष्ट्रातील जळगाव येथे एका तरुणाने वडिलांची क्षुल्लक कारणावरून हत्या केली. वडिल लग्नासाठी लक्ष घालत नव्हते ही गोष्ट तरुणाच्या ध्यानात आल्यानंतर त्याने रागाच्या भरात वडिलांची कुऱ्हाड डोक्यात घालून हत्या केली आहे. ही घटना संतापजनक घटना यावल तालुक्यात घडली. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. (हेही वाचा- क्रिकेट खेळण्यावरून वाद जीवाशी बेतला, मुंबई पोलिस हवालदाराची हत्या,)
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलाने आपल्या वडिलांची निर्घृण हत्या केली. ही घटना जळगाव येथील यावल तालुक्यातील पिळोदा खुर्द गावात घडली. या घटनेनंतर पिळोदा गावात एकच खळबळ उडाली आहे. रतन कोळी असं या घटनेत हत्या झालेल्या वडिलाचे नाव आहे. त्यांचा आरोपी मुलगा देवानंद कोळी यांनी त्याच्या वडिलांची हत्या केली. हे कुटुंब मोलमजुरी करत उदरनिर्वाह होते. गेल्या काही दिवसांपासून लग्नावरून मुलगा नेहमी वडिलांशी भांडण करायचा अशी माहिती गावातील लोकांनी दिली.
लग्नाच्या विषयावरून अनेक त्यांना शिवीगाळ करत मारहाण देखील केली. आपले वडिल विवाह करण्यास टाळत असल्याचे त्याला समजलं त्यावरून रागाच्या भरात त्याने वडिलांच्या डोक्यात कुऱ्हाडीने सपासप वार केला. या जीवघेण्या हल्ल्यात वडिल गंभीर झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती आरोपीच्या आईने शबाबाई कोळी यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीनुसार आरोप देवानंद यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक करून पोलिस कोठडीत ठेवले आहे. या प्रकरणी पुढील कारवाई सुरु आहे.