लोणावळ्यात भरणार कडधान्य विक्रेत्यांचे राष्ट्रीय अधिवेशन, जगभरातील 1500 व्यापारी होणार सहभागी
Foodgrains (Photo Credits: File Photo)

भारतीय कडधान्य व्यापार आणि उद्योगक्षेत्रातील इंडिया पल्सेस अॅण्ड ग्रेन्स असोसिएशन (IPGA) या महत्वपुर्ण संघटनेने 'द पल्सेस कॉन्क्लेव्ह' परिषदेच्या पाचव्या सत्राची नुकतीच घोषणा केली. हे द्विवार्षिक परिषद यंदा लोणावळ्यातील (Lonavala) अॅम्बी व्हॅली येथे आयोजित करण्यात आले आहे. मटाने दिलेल्या वृत्तानुसार, कडधान्य व्यापा-यांसाठी आयोजित करण्यात येणा-या या परिषदेत भारतासह ऑस्ट्रेलिया, कॅनडा, म्यानमार, युगांडा यांसारख्या अन्य देशातील जवळपास 1500 व्यापारी सहभागी होणार आहेत. ही परिषद 12 ते 14 फेब्रुवारी 2020 मध्ये आयोजित करण्यात आली आहे.

द पल्सेस कॉन्क्लेव्ह 2020 या परिषदेत कडधान्यांच्या स्थानिक उत्पादन व वापराबाबत विविध मुद्दे चर्चेत घेण्यात येणार आहेत. परंतु, त्याचसोबत प्रक्रिया क्षमतेचा विकास, वापरातील वाढ, निर्यात, मूल्यवर्धन, प्रथिन शोषण, कापणी-उत्तर पीक व्यवस्थापन आदी मुद्देही लक्षात घेण्यात येणार आहेत.

हेदेखील वाचा- मूग डाळ, मसूर डाळ जरा बेतानेच खा ! FSSAI ने व्यक्त केला विषारी घटकांचा धोका

जागतिक व स्थानिक कडधान्य उत्पादन प्रमाण, स्थानिक व जागतिक किंमती, पुरवठा व मागणीचे गुणोत्तर या अनुषंगाने हा परिषद उपक्रम आखण्यात आला आहे. असे असले तरीही, टीपीसी 2020 मध्ये, हे मुद्दे लक्षात घेण्यासोबतच, आयपीजीएच्या दृष्टीकोनापलीकडे जाऊन नवा आधुनिक व्यापार दृष्टीकोन लक्षात घेतला जाणार आहे.

भारतात कडधान्ये हा प्रथिनांचा मुख्य स्त्रोत असून, कडधान्यांच्या उपलब्धतेसोबतच त्यांची किफायतशीरता तितकीच महत्वाची आहे, यावर आयपीजीएचा विश्वास आहे. शेतकरी व ग्राहक दोहोंना फायदा पोहोचेल, असे काहीतरी सरकारने करण्याची गरज आहे. बीपीएल समुदायाला कडधान्ये किफायतशीर वाटावीत, यासाठी आयपीजीएतर्फे पीडीएसमध्ये कडधान्यांचा अंतर्भाव करण्यात येण्यासाठी सरकारला विनंती करण्यात येणार आहे.