मूग डाळ, मसूर डाळ जरा  बेतानेच खा ! FSSAI ने व्यक्त केला विषारी घटकांचा धोका
मूग डाळ, मसूर डाळ

डाळींशिवाय भारतीयांच्या नियमित जेवणाचा अनेकजण विचारच करू शकत नाहीत. मात्र फूड सेफ्टी अॅंड स्टॅंडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया FSSAI दिलेल्या माहितीनुसार भारतामध्ये कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशातून येणारी मूग, मसूर डाळ घातक आहे. या डाळींमध्ये विषारी घटक असून त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

लॅब टेस्टिंग सुरू

फूड सेफ्टी अॅंड स्टॅंडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया FSSAI ने डाळींचे नमूने तपासणीसाठी पाठवले आहेत. या डाळींमध्ये हर्बीसाइड ग्लायफोसेटच अधिक प्रमाणात असण्याची शक्यता आहे. हे घटक कॅन्सरचा धोका वाढवण्यास कारणीभूत ठरतात. अधिक प्रमाणात ग्लायफोसेट घटक शरीरात गेल्यास पोषक घटक शोषून घेण्याची क्षमता कमी होते, रोगप्रतिकारशक्ती कमी होते, किडनी निकामी होण्याचाही धोका असतो.

भारतामध्ये ग्लायफोसेटचं प्रमाण किती असावं ? किंवा त्याच्या तपासणीसाठी कोणतीच यंत्रणा नाही. सध्या Codex Alimentarius international food standards guidelines नुसारच त्याची चाचणी केली जाईल.

तुम्ही मूग, मसूर डाळींचा वापर करत असल्याचा वापरण्यापूर्वी ती स्वच्छ धुवावी. यामुळे डाळींवरील घातक पदार्थांचा धोका कमी होतो.