Uddhav Thackeray Receives Invitation For Ram Temple Consecration: राम मंदिर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरेंना स्पीडपोस्टद्वारे निमंत्रण
Uddhav Thackeray, Ram Mandir (PC - Facebook ANI)

Uddhav Thackeray Receives Invitation For Ram Temple Consecration: शिवसेना UBT नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला (Ram Temple Consecration) उपस्थित राहण्यासाठी स्पीड पोस्टद्वारे (Speedpost) निमंत्रण मिळाले आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या दोनच दिवस आधी स्पीड पोस्टद्वारे हे निमंत्रण मिळाल्याने शिवसेनेने (यूबीटी) नाराजी व्यक्त केली आहे. आता भाजपला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असे पक्षाने म्हटलं आहे.

संजय राऊत म्हणाले, 'भगवान राम त्यांना शाप देतील'

दरम्यान, शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी स्पीड पोस्टद्वारे निमंत्रण मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, 'भगवान राम त्यांना (ज्यांनी आमंत्रण पाठवले त्यांना) शाप देतील. तुम्ही सेलिब्रिटी आणि सिनेतारकांना खास निमंत्रण देत आहात, त्यांचा रामजन्मभूमीशी काहीही संबंध नाही. रामजन्मभूमी आंदोलनात ठाकरे कुटुंबाची महत्त्वाची भूमिका होती, भाजप त्या कुटुंबाशी असे वागत आहे. प्रभू राम त्यांना कधी माफ करणार नाहीत, शाप देतील. तुम्ही प्रभू रामाची प्रार्थना करत आहात आणि रावणाप्रमाणे सरकार चालवत आहात.' (हेही वाचा - उद्धव ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह, महापत्रकार परिषद ठरली बूस्टर डोस; खारेगाव शिवसेना (UBT) शाखेत समर्थकांमध्ये वाढ)

शिवसेनेचे (यूबीटी) प्रवक्ते आनंद दुबे यांनी सांगितलं की, 'राम मंदिर आंदोलनात ज्या पक्षाचे सर्वाधिक योगदान आहे, त्या पक्षाच्या प्रमुखांना स्पीड पोस्टद्वारे आमंत्रित करण्यात आले आहे. ही खेदाची बाब आहे... यानंतर भाजपला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही.' (हेही वाचा - (हेही वाचा, Quit BJP Joined Shiv Sena (UBT): उद्धव ठाकरे यांची ताकद वाढली, भाजप आणि थेट संघालाही धक्का)

उद्धव ठाकरे कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत -

उद्धव ठाकरे अयोध्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसून ते नाशिकच्या ग्रामीण भागातील भगूर येथील वीर सावरकरांच्या जन्मभूमीला भेट देणार आहेत. याशिवाय ते सायंकाळी श्री काळाराम मंदिर आणि गोदा घाटावर आरती करतील. राम मंदिर आंदोलनात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे.

संजय राऊत यांनी नाशिकचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत राममंदिर आंदोलनात बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्णायक भूमिकेवर भर दिला. प्रभू रामाशी संबंधित असलेल्या नाशिकला पक्षात विशेष स्थान आहे. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारीला नाशिकमध्ये होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनात महत्त्वाचे ठराव पारित होण्याची अपेक्षा आहे. 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त, शिवसेना (UBT) नाशिकमध्ये शिबिर आणि रॅलीद्वारे आपल्या राजकीय प्रचाराची सुरुवात करण्याची योजना आखत आहे. वनवासाच्या काळात प्रभू रामांचे निवासस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचवटीतील काळा राम मंदिराला उद्धव ठाकरे भेट देणार आहेत.