शिवसेना (Shiv Sena) पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आत्मविश्वास कमी होईल आणि राजकीय दृष्ट्या त्यांचा प्रभावही संपुष्टात येईल, अशी अटकळ राज्य आणि केंद्रातील अनेकांनी बांधली होती. मात्र, या सर्वांनाच छेद देत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (UBT) पक्षाने आपला करीश्मा दाखविण्यास सुरुवात केली आहे. दररोज नवनवे पक्षप्रवेश पार पडत असून संघटनेची ताकदही वाढत असल्याचे पाहायला मिळते आहे. भाजप आणि संघातील अनेक जण आज शिवबंधनात (Shiv Sena-UBT) अडकले. त्यामुळे ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजप आणि थेट संघालाही धक्का (Quit BJP Joined Shiv Sena (UBT)) दिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आगामी लोकसभा निवडणूक 2024 आणि त्यानंतर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर हे प्रवेश महत्त्वाचे मानले जात आहेत.
भाजप आणि संघातून थेट शिवसेना (UBT) पक्षप्रवेश
प्राप्त माहतीनुसार, भाजप उत्तर मुंबई जिल्हा सचिव प्रदीप उपाध्याय, विश्व हिंदू परिषदेचे गोरेगाव विभाग धर्माचार्य प्रमुख व भारतीय ब्राम्हण स्वाभिमान परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष घनश्याम दुबे, विश्व हिंदू परिषदेचे उत्तर मुंबईचे माजी जिल्हा कोषाध्यक्ष रविचंद्र उपाध्याय, उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय बजरंग दल अक्षय कदम आदींनी आज (19 जानेवारी) मातोश्री येथे शिवबंधन बांधले आणि अधिकृतरित्या शिवसेना (UBT) पक्षात प्रवेश केला. (हेही वाचा, Uddhav Thackeray On Dynastic Politics: घरंदाज माणसानेच घराणेशाही विषयावर बोलावे; उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदी यांना टोला)
'दिल की बात' म्हणत भाजपला टोला
आज आपण सर्वांनी शिवसेना (UBT) पक्षात प्रवेश केला. आपल्या भावना व्यक्त केल्या. खरे म्हणजे अनेकांची 'मन की बात' विचार करुन केली जाते. आपण सर्वांनी व्यक्त केलेल्या भावना या 'दिल की बात' होती. आज आम्हाला योगदानाबद्दल प्रश्न विचारले जातात. पण, 1992 मध्ये शिवसेना आणि शिवसैनिक होते म्हणूनच मुंबई वाचली. आम्ही कोणाला काय दिले, याची आठवण आज मला करुन द्यायची नाही. पण आपणा सगळ्यांनाच माहिती आहे, शिवसेना पक्षाचे योगदान काय, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्हाला बाळासाहेबांनी शिकवले आहे. मदत करायची तर सढळ हाताने करायची. त्यात आपण कोणाला मदत करतो आहे ते अजिबात पाहायचे नाही. त्यामुळे आम्ही कधीही परप्रांतीय, उत्तर भारतीय असा भेदभाव करत नाही. आपण सर्व हिंदू आहोत, इतकेच पुरेसे आहे, असेही उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. (हेही वाचा, Saamana Attacks On Bjp: 'नार्वेकरांनी भाजपच्या टेस्ट ट्यूब बेबीचं रूपांतर खऱ्या शिवसेनेत केलं'; UBT मुखपत्र 'सामना'तून भाजपवर टीकास्त्र)
व्हिडिओ
#WATCH | Former Maharashtra CM Uddhav Thackeray says, "...Those who were saved by Balasaheb Thackeray are now trying to destroy Shiv Sena...We say 'Garv Se Kaho Hum Hindu Hain' but the 'nalayak' people are discriminating among Hindus, Hindutva. You should be cautious of such… pic.twitter.com/CVGmELnGTT
— ANI (@ANI) January 19, 2024
दरम्यान, आजच्या पक्षप्रवेशामुळे उत्तर भारतीय मतांमध्ये मोठा प्रभाव निर्माण होईल. ज्याचा फायदा शिवसेना (UBT) पक्षाला मिळेल असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. अलिकडील काळात भाजपने उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावरील टीका वाढवली आहे. तसेच, त्यांना घेरण्याचे प्रयत्नही मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जातो आहे.