Saamana Attacks On Bjp: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या (Shiv Sena) 16 आमदारांना अपात्र न ठरवल्याप्रकरणी शिवसेनेचे (यूबीटी) मुखपत्रातून भाजपवर (BJP) जोरदार टीका करण्यात आली आहे. सामनाने भाजपच्या टेस्ट ट्यूब बेबीच्या (Test Tube Baby) प्रयोगातून शिंदे गटाचा (Shinde Group) खरपूस समाचार घेतला आहे. शिंदे गट हा भाजपच्या टेस्ट ट्यूब बेबी प्रयोगातून जन्माला आला आहे, अशा शब्दांत सामनातून शिंदे गट शिवसेना आणि भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.
भाजपचे आमदार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी गेल्या 5 वर्षात चार पक्षांना भेटी दिल्या आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाच्या सदोष आदेशाचे समर्थन करत आपली टेस्ट ट्यूब बेबी हीच खरी शिवसेना असल्याचे सांगितलं आहे, असंही सामनाच्या अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी बुधवारी एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून घोषित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उद्धव सेना आणि त्यांच्या महाविकास आघाडीवर टीका केली. (हेही वाचा - Shiv Sena MLA Disqualification Case: राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात शिवसेना- UBT गट सर्वोच्च न्यायालयात जाणार; जाणून घ्या Uddhav Thackeray, Aaditya Thackeray यांची प्रतिक्रिया)
Shiv Sena (UBT) mouth piece Samanna’s scathing edit: Shinde faction is born through BJP’s test tube baby experiment. BJP MLA & assembly speaker Narvekar who himself travelled four parties in last 5 year’s endorses ECI faulty order stating their test tube baby is real Shiv Sena.
— Sudhir Suryawanshi (@ss_suryawanshi) January 11, 2024
सत्याचा आणि लोकशाहीचा विजय - एकनाथ शिंदे
शिंदे यांच्या नेतृत्वाखालील प्रतिस्पर्धी गटाशी भांडण झालेल्या उद्धव गटाला सभापतींच्या या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. तथापी, यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हा सत्याचा, लोकशाहीचा विजय आहे. हा शिवसेना कार्यकर्त्यांचा विजय आहे. लोकशाहीत बहुमत महत्त्वाचे असते. त्यामुळे माझ्या मते हा निर्णय गुणवत्तेवर आधारित आहे. कोणीही राजकीय पक्षाचा खाजगी मालमत्ता म्हणून वापर करू शकत नाही.