मुंबई -पुणे दरम्यान आता EveyTrans Private Limited च्या धावणार इलेक्ट्रिक बस;  दसर्‍या मुहूर्तावर प्रवाशांसाठी सेवा खुली
E Bus | PC: ANI

आघाडीची इलेक्ट्रिक बस ऑपरेटर कंपनी EveyTrans Private Limited कडून मुंबई-पुणे दरम्यान नवी इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केली आहे. या इंटर सिटी बस सेवेचं नाव ‘PuriBus’आहे. दसर्‍याच्या मुहूर्तावर उद्या 15 ऑक्टोबरला या बससेवेचा प्रवाशांसाठी श्रीगणेश होणार आहे. मुंबई-पुणे दरम्यान धावणार्‍या या बसची वैशिष्ट्यं म्हणजे ही लॉंग डिस्टंन्स असून झिरो इमिशन, आवाज न करणारी आणि आरामदायी बस आहे. पुरी बस ही एकदा चार्ज झाल्यानंतर 350 किमीचा प्रवास करू शकते. केंद्र आणि राज्य सरकार FAME I आणि FAME 2 पॉलिसी अंतर्गत इलेक्ट्रिक बस पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नक्की वाचा:  Maharashtra Electric Vehicle Policy: महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर, पाहा काय आहेत तरतुदी.

मुंबई-पुणे दरम्यान धावणार्‍या या इलेक्ट्रिक इंटर सिटी कोच बसमध्ये आसनक्षमता 45 जणांची आहे. प्रवाशांसोबत ड्रायव्हर, को ड्रायव्हरची वेगळी जागा असणार आहे. ही बस विशिष्ट पद्धतीने बनवण्यात आल्याने लूक आकर्षक आहे सोबतच आरामदायी देखील आहे. ही एससी ई बस लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आरामदायी आहे. पुणेकरांच्या दिमतीला E-Bus; पहा वैशिष्ट्यपूर्ण E-Bus कोणत्या मार्गावर धावणार, तिकीट दर किती?

बसमध्ये पुश बॅक सीट्स आहेत. टीव्ही आहे. वाय फायने सुसज्ज अशी इंफोटेन्मेंट सिस्टम आहे. प्रत्येक आसनाजवळ युएसबी चार्जर पोर्ट आहे. लगेज स्पेस देखील मुबलक आहे.