Pune E Bus Service ( Image used for representational purpose | (Photo Credits: File Photo)

Pune E - Bus Service: पुण्यामध्ये अरुंद रस्ते आणि ट्राफिकच्या समस्येमुळे कार, स्कुटर अधिक प्रमाणात रस्त्यांवर असतात. यामुळे प्रदुषणाची समस्या वाढतेय त्यासोबतच सार्वजनिक वाहतुकीचीदेखील बोंब आहे. मात्र आता पुणे पालिका प्रशासनाने ई बस ताफ्यात आणल्याने पुणेकरांना गारेगार प्रवास अगदी माफत दरात आणि प्रदुषण कमी करणार्‍या वाहनांसोबत करता येणार आहे. पुण्यातील बहुप्रतिक्षित ई बस (E -Bus) सेवा 9 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. 25 ई बसेसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanavis) यांच्या हस्ते होणार आहे.

काय असेल E-Bus चे बस भाडे?

पुण्यातील ई बस एसी म्हणजेच वातानुकुलित असली तरीही बसभाडं सामान्य बस इतकेच असणार आहे.

पुण्यात कोण-कोणत्या मार्गावर धावणार ई- बस ?

पुण्यात चार आणि पिंपरी चिंचवड येथे तीन अशा एकूण सात मार्गांवर ई बस धावणार आहे.

1. डांगे चौक ते हिंजवडी माण फेज 3

बस - 6

फेर्‍या - 96

दर 20 मिनिटांनंतर बस येईल.

2. आकुर्डी रेल्वे स्टेशन ते मनपा

बस - 2

फेर्‍या - 20

दर 45 मिनिटांनंतर बस येईल.

3. निगडी ते भोसरी

बस - 2

फेर्‍या - 48

दर 60 मिनिटांनंतर बस येईल.

4. हडपसर ते पिंपळे गुरव

बस - 3

फेर्‍या - 60

दर 30 मिनिटांनंतर बस येईल.

5. भेकराईनगर ते न. ता. वाडी

बस - 3

फेर्‍या-48

दर 45 मिनिटांनंतर बस येईल.

6. भेकराईनगर ते पुणे स्टेशन

बस - 3

फेर्‍या-54

दर 30 मिनिटांनंतर बस येईल.

7. हडपसर ते हिंजवडी माण फेज ३

बस -3

फेर्‍या - 18

दर 60 मिनिटांनंतर बस येईल.

कशा असतील इलेक्ट्रिक बस ?

  • पुण्याच्या ताफ्यात 25 इलेक्ट्रिकच्या बस लवकरच येणार आहेत.
  • बसमध्ये सुमारे 31 आसनक्षमतेच्या असतील.
  • साऱ्या बस वातानुकूलित असतील.
  • ‘ओलेक्ट्रा ग्रीनटेक’ या कंपनीला या बससाठीचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. ही कंपनीनेच चार्जिंग आणि देखभालीची जबाबदारी घेणार आहे.
  • बस चार्जिंग साठी वीज पुरवठा पालिकेमार्फत केला जाईल.
  •  निगडी व भेकराईनगर येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात आली आहेत
  • पर्यावरणपूरक आणि कमी खर्चिक बस सेवा - इलेक्ट्रिक बसला दिवसा प्रति किमी 6 रुपये खर्च तर रात्री प्रति किमी 4.5 रुपये खर्च आहे. हा खर्च पालिका उचलणार आहे. सध्या सीएनजीवर चालणाऱ्या बससाठी 54 रुपये 7 पैसे प्रति किमी खर्च आहे. या बस नॉन एसी आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिकच्या बस प्रवासी आणि प्रशासन अशा दोन्हीसाठी फायदेशीर आहेत.

पुणेकरांचा प्रतिसाद पाहता भविष्यात अधिक बस ताफ्यात सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.