Sanjay Rathod (Photo Credit: Twitter)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) समोर आलेले वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव समोर आले. मात्र पूजाच्या आत्महत्येनंतर संजय राठोड पंधरा दिवस नॉट रिचेबल होते. मात्र 23 फेब्रुवारीला पोहरादेवी ते लोकांसमोर आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच गर्दी केली होती. या गर्दीला मंत्री आणि महंतांना जबाबदार धरायचे सोडून याचे खापर वाशिम पोलिसांवर फोडले जात आहे. ABP माझाने दिलेल्या वृत्तानुसार, राठोडांच्या 25 हजार समर्थकांपुढे 275 पोलिसांचा बंदोबस्त कमी पडला अशी टिका केली जात आहे.

पोहरादेवीत 23 फेब्रुवारीला संजय राठोड यांचे तब्बल 15 दिवसांनी आगमन झाले आणि अचानक त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. यात जवळपास 500-1000 नाही तर 25 हजारांपेक्षा अधिक समर्थक आले होते. यावेळी पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त केला होता. मात्र राठोडांच्या समर्थकांपुढे पोलिसांचा फौजफाटा कमी पडला असा सूर उमटू लागला आहे.

हेदेखील वाचा- Sanjay Rathod: वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ पोहरादेवी येथे जमलेल्या 10 हजार जणांवर गुन्हा दाखल

मात्र या सर्व घटनेला मंत्री आणि महंतांना जबाबदार धरण्याऐवजी पोलिसांनाच जबाबदार धरण्यात आले आहे. दरम्यान पोहरादेवी जगदंबा देवीचे महंत कबिरदास महाराज यांच्यासह एकूण 19 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कबिरदास महाराज यांच्या कुटुंबातील तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. काही जणांना कोरोनाची लक्षणं असल्याचीही माहिती समोर येत आहे.

राज्यातील कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, मोर्चांवर बंदी घातली आहे. त्यामुळे अनेक नेत्यांनी आपले राजकीय दौरे रद्द केले. मात्र नियमांचे उल्लंघन करत संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यांच्या स्वागतासाठी तब्बल 10 हजार लोक जमले होते. मात्र पोहरादेवी मंदिराचे अध्यक्ष महंत कबीरदास इतर 19 जण कोरोना पॉझिटीव्ह आढल्याने आता कोरोनाचा धोका निश्चितच वाढला आहे.