पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणी विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपांवर शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी मंगळवारी पोहरादेवी (Pohradevi) येथे येऊन पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, यावेळी त्यांच्या समर्थकांकडून शक्तीप्रदर्शन करताना "कोण आला रे कोण आला…बंजाऱ्यांचा वाघ आला" अशा घोषणा देत प्रचंड गर्दी केली होती. दरम्यान, कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संजय राठोड यांच्या 10 हजार समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पूजा चव्हाण प्रकरण चर्चेत आल्यापासूनच संजय राठोड अज्ञातवासात गेले होते. एका ऑडिओ क्लिपमुळे संजय राठोड यांचे नाव चर्चेत आलं होतं. यानंतर भाजपाने जाहीरपणे संजय राठोड यांच्याविरोधात कारवाईची मागणी सुरु केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच संजय राठोड सर्वांसमोर आले असून पोहरादेवीत दाखल झाले होते. त्यावेळ त्यांचे 10 हजार समर्थक त्याठिकाणी उपस्थित होते. त्यानंतर मंगळवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास वाशिम पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हे देखील वाचा- Maharashtra Police: कोविड-19 च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कार्यालयीन वेळेत बदल; 'वर्क फ्रॉम होम'चाही पर्याय
व्हिडिओ-
Crowd is hovering around Maharashtra Minister Sanjay Rathod's convoy .
@priyankac19 ji Uddhav ji se bolo iss minister se pooche," lockdown chahiye ,chahiye lockdown" pic.twitter.com/SJhgwJkg5f
— Dolli (@desh_bhkt) February 23, 2021
संजय राठोड यांच्या समर्थकांच्या गर्दीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच संजय राठोड कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करून पोहरादेवी परिसरात शक्ती प्रदर्शन करतायत. धनंजय महाडिकांवर गुन्हे दाखल करणारे सरकार आपल्या मंत्र्यांविरुद्ध कोरोना उल्लंघनाचा तरी गुन्हा दाखल करण्याची हिम्मत दाखवणार का? असा सवालही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्य सरकारला विचारला आहे.