Indurikar Maharaj vs Gautami Patil: महाराष्ट्रात सध्या कला आणि अध्यात्मिक क्षेत्रात संमिश्र घुसळण सुरु आहे. एका बाजूला किर्तनकार निवृत्ती देशमुख इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) तर दुसऱ्या बाजूला डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil). इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातून वापरत असलेली भाषा आणि गौतमी पाटील ही आपल्या नृत्यातून करत असलेले हावभाव यांवरुन अनेकदा वाद निर्माण होतात. अनेकदा वादात अडकलेल्या या व्यक्तीमत्वांपैकी एकाने जर दुसऱ्यावर प्रतिक्रिया दिली तर? होय, कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी गौतमी पाटील (Indurikar Maharaj On Gautami Patil) हिच्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथे इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन होते. या कीर्तनात बोलताना इंदुरीकर महाराज यांनी म्हटले की, समाजाती मानसिकता प्रतंड बदलली आहे. आम्ही कीर्तनाच्या कार्यक्रमाला पाच हजार मागितले तर महाराजांनी पैशांचा बाजार मांडला म्हणतात. पण, त्या ठिकाणी गौतमी पाटील हिने तीन गाणी वाजवली तर तिला तिन लाख द्यायला तयार होता. इकडे आम्हाला टाळ वाजवून काहीच नाही. तिच्या कार्यक्रमासाठी लोकं झाडावर चढतात. काही मारामारी करतात, काहींचे गुडघे फुटटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीच नाही. साधं संरक्षण मागितलं तरी ते मिळत नाहीत, असे म्हणत इंदुरीकर महाराज यांनी गौतमीवर भाष्य केले आहे. (हेही वाचा, Gautami Patil Lavni Dance In Satara: पैलवानाच्या आग्रहाखातर लाडक्या बैलाच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील साताऱ्यात (Watch Video))
गौतमी पाटील
गौतमी पाटील ही महाराष्ट्रातील एक नर्तकी आहे. जी तिच्या लावणी नृत्यशैलीसाठी ओळखली जाते. लावणी हा पारंपरिक नृत्य प्रकार आहे. मात्र, या नृत्यप्रकारात तिने इतरही काही गोष्टी अंतर्भूत केल्या. परिणामी तिच्यावर अश्लिलता आणि कलेला गालबोट लावल्याचाही आरोप झाला. तिच्या डान्सचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिला लोकप्रियता मिळाली. दरम्यान, गौतमी पाटील हिचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पाहिले जातात. शिवाय तिला विविध उत्सव आणि कार्यक्रमांमध्ये सादरीकरणासाठी निमंत्रीत केले जाते.
इंदुरीकर महाराज
इंदुरीकर महाराज यांचे खरे नाव निवृत्ती देशमुख असे आहे. ते महाराष्ट्रातील वर्तमान काळातील सर्वात लोकप्रीय कीर्तनकार म्हणून ओळखले जातात. ते अध्यात्म आणि सामाजिक विषयांवर विनोदी आणि विचारप्रवर्तक प्रवचनांसाठी ओळखले जातात. इंदुरीकर महाराजांची मराठी भाषेत प्रवचने आणि कीर्तन यांमध्ये हिंदू पौराणिक कथा, सामाजिक समस्या आणि वैयक्तिक विकास यासह विविध विषयांचा समावेश करतात. त्याची प्रसूतीची शैली बुद्धी, विनोद आणि मानवी स्वभावातील खोल अंतर्दृष्टी यासाठी ओळखली जाते. इंदुरीकर महाराजांचा महाराष्ट्रात मोठा अनुयायी असून त्यांनी राज्यभरातील विविध धार्मिक व सामाजिक मेळाव्यात भाषणे केली आहेत. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांना मदत पुरवण्यासह त्यांच्या परोपकारी कार्यासाठीही ते ओळखले जातात. इंदुरीकर महाराज यांनी लिंग आणि लैंगिकता यासारख्या संवेदनशील विषयांवर केलेल्या त्यांच्या काही विधानांमुळे वादाचा सामना करावा लागला आहे.