आत्महत्या (फोटो सौजन्य- Pixabay, Open Clip Art)

सध्या देशात कोरोना विषाणूचे (Coronavirus) संकट आ वासून उभे आहे. या विषाणूमुळे दररोज अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. अशात नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB) आपला डेटा जारी केला आहे, ज्यामध्ये विविध कारणांमुळे देशात झालेल्या मृत्यूंची नोंद आहे. या अहवालानुसार, गेल्या वर्षी देशात दररोज सरासरी 381 लोकांनी आत्महत्या (Suicides) केली आहे. वर्षभरात आत्महत्येमुळे जवळपास 1,39,123 जण मृत्यूमुखी पडले. आकडेवारीनुसार 2017 आणि 2018 च्या तुलनेत मागील वर्षी आत्महत्याच्या घटनांमध्ये 4.4% वाढ झाली आहे. महत्वाचे म्हणजे विविध कारणांमुळे होणाऱ्या आत्महत्येच्या बाबतीत महाराष्ट्र (Maharashtra) आघाडीवर आहे.

2017 मध्ये 1,29, 887, तर 2018 मध्ये 1, 34, 516 आत्महत्या नोंदवल्या गेल्या आहेत. 2018 च्या तुलनेत यावर्षी आत्महत्येच्या प्रमाणात (1 लाख लोकसंख्या असलेल्या) 0.2% वाढ झाली आहे. शहरांमध्ये आत्महत्येचे प्रमाण 13.9 % होते, जे देशभरातील 10.4 % आत्महत्यांच्या तुलनेत खूपच जास्त आहे. आत्महत्या केलेल्या प्रत्येक 100 लोकांमध्ये 70.2% पुरुष आणि 29.8% महिलांचा समावेश आहे.

आकडेवारीनुसार, एकूण मृत्यू झालेल्या लोकांमध्ये 53.6% लोकांना फाशी देण्यात आली होती, विष खाऊन 25.8 टक्के लोक, पाण्यात बुडून 5.2 % आणि आत्महत्या करून ३.8%  लोकांनी आपले जीवन संपवले. या प्रकरणांपैकी 32.4 % प्रकरणांमध्ये कौटुंबिक वाद हे कारण होते, तर 5.5 टक्के मृत्यूमागे लग्न आणि 17.1 टक्के मृत्युन्मध्ये आजार हे कारण होते. (हेही वाचा: कोणत्याही प्रश्नावर आत्महत्या हा पर्याय नाही - रोहित पवार)

या आकडेवारीनुसार देशातील आत्महत्येच्या एकूण घटनांपैकी 49.5 टक्के प्रकरणांची नोंद फक्त पाच राज्यांमध्ये झाली आहेत. उर्वरित 50.5 टक्के प्रकरणे देशातील उर्वरित 24 राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशांत नोंदवली गेली आहेत. सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत (18,916) त्यानंतर तामिळनाडूमध्ये 13,493, पश्चिम बंगालमध्ये 12,665, मध्य प्रदेशात 12,457 आणि कर्नाटकमध्ये 11,288.