Indeed चे CEO ख्रिस हॅम्स यांनी जाहीर केले आहे की, Indeed आणि Indeed Flex मध्ये प्रत्येक प्रदेशानुसार आणि प्रत्येक विभागात कर्मचारी कपात करण्यात येणार आहे. अनेकांना नोकरी मिळवून देणाऱ्या कंपनीतच नोकऱ्या गमावण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे हे विशेष. इंडिड हे अग्रगण्य जॉब पोर्टल आहे. ख्रिस हॅम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या 2,200 कर्मचाऱ्यांपैकी 15 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरूनकमी केले आहे.
ख्रिस हॅम्स यांनी बुधवारी एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, साधारण 2,200 लोकांना कामावरुन कमी केले जाईल. एकूण कर्मचाऱ्यांच्या 15% कर्मचारी कपात करण्याचे आमचे लक्ष्य आहे. हा निर्णय घेताना नेमक्या कोणत्या विभागात आणि प्रदेशात याची अंमलबजावणी करायची हे आमच्यासाठी मोठे आव्हान होते. पण आम्हाला ते पेलावेच लागले. पुढे बोलताना ते म्हणाले, "ज्या कंपनीचे ध्येय लोकांना नोकऱ्या मिळवून देणे हे आहे. असे असताना त्याच कंपनीत कर्मचारी कपात करावी लागते आहे. मी दररोज विचार करतो प्रत्येक गरजू व्यक्तीच्या आयुष्यात नोकरी किती महत्त्वाची आहे. नोकरी गमावणे आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या खूप कठीण आहे." (हेही वाचा, MyGate Layoffs: मायगेट कंपनीने केली 30 टक्के कर्मचारी कपात)
Indeed एक ऑनलाइन जॉब सर्च प्लॅटफॉर्म आहे जे नोकरी शोधणार्यांना विविध उद्योग आणि स्थानांमध्ये रोजगाराच्या संधी शोधू देते. हे पोर्टल 2004 मध्ये लाँच केले गेले . तेव्हापासून ते जगातील सर्वात लोकप्रिय नोकरी शोध इंजिनांपैकी एक बनले आहे. हजारो वेबसाइट्स, जॉब बोर्ड, कंपनी करिअर पेजेस आणि स्टाफिंग एजन्सीजवरील नोकरीची सूची (डेटा) एकत्रित करते. ज्यामुळे नोकरी शोधणाऱ्यांना त्यांच्या कौशल्य आणि आवडीशी जुळणाऱ्या नोकरीच्या संधी शोधणे सोपे होते. Indeed Flex ही सुद्धा Indeed चीच एक उपकंपनी आहे.