Turmeric Export: वाढती मागणी आणि निर्यातीमुळे हळदीच्या दरांत वाढ; हळद उत्पादकांसह व्यापारी वर्गात आनंद
Photo Credit -X

Turmeric Export : हळद निर्यातीच्या वाढत्या मागणी आणि अनुकूल कृषी परिस्थिती या दोन्ही कारणांमुळे हळदीच्या किमतीत लक्षणीय वाढ (Turmeric Price Hike)झाली आहे. राजेंद्र देसा, एक हळद विक्रेते, बाजारातील सध्याच्या परिस्थितीवर बोलताना म्हणाले की, या वर्षीचा मुबलक पाऊस आणि पाणी पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचे हळदीचे उत्पादन जास्त झाले आहे. दरवर्षी सरासरी 25 क्विंटल प्रति एकर हळदीचे उत्पादन होत असते. मात्र, यंदा अनुकूल परिस्थितीमुळे हळद उत्पादक (Turmeric growers) शेतकऱ्यांनी 30-35 क्विंटल प्रति एकर हळदीचे पीक घेतले असल्याची माहिती आहे.(हेही वाचा : Beed Farmar Suicidal Attempt: बीड मध्ये वीज वितरणाकडून कनेक्शन कापल्याने आर्थिक ताणातून विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती चिंताजनक)

हळदीला 15,000 ते 20,000 प्रति क्विंटल दर मिळत आहे. गतवर्षी हाच दर 6,000 ते 8,000 रुपये प्रति क्विंटल होता. त्यामुळे यंदा दरात लक्षणीय वाढ झाल्याचे देसा यांनी सांगितले. गेल्या २-३ वर्षांत हळदीची निर्यात मागणी वाढल्याने किमतीत वाढ झाली आहे. हळद, भारतीय खाद्यपदार्थातील एक प्रमुख आणि औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जाते. दुबई, यूएसए आणि अगदी पाकिस्तानसह विविध देशांमध्ये हळदीची निर्यात केली जाते.

निर्यात मागणी वाढल्याने देशांतर्गत पुरवठ्यात काहीशा प्रमाणात घट झाली आहे. ज्यामुळे किमती आणखी वाढल्या आहेत. पूर्वी, देसा सारख्या विक्रेत्यांना 8,000 ते 9,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी, 15,000 ते 20,000 रुपये प्रति क्विंटल या दर मिळाल्याने, हळद उत्पादक आनंदात आहेत.