शेतकरी हा अन्नदाता असूनही त्याला अनेक संकटांचा सामना करत धान्य पिकवावं लागतं. अनेकदा प्रतिकूल परिस्थितीसमोर गुडघे टेकवून काही जण टोकाचे निर्णय घेतात. अशीच एक क्लेषकारक घटना बीड (Beed) मध्ये गेवराई तालुक्यात असणार्या मालेगाव बुद्रुक मध्ये घडली आहे. रब्बी पीकांना पाणी देण्याचं काम सुरू असताना अचानक महावितरण कडून वीज कनेक्शन बंद करण्यात आलं. पाण्याअभावी पीकं जळत होती. डोळ्यादेखत पीकाची होणारी ही अवस्था पाहून शेतकर्याने सोशल मीडीयावर लाईव्ह करत विष प्राशन केले आहे. आत्महत्या करणार्या शेतकर्याचं [Poll ID="null" title="undefined"]नाव नारायण वाघमोडे आहे.
खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने पीक हातातून गेलं होतं. आता रब्बी हंगामामध्ये तरी चांगली पेरणी करून पीकं जगवली जातील अशी वाघमोडे यांची आशा होती. पीकांना पाण्याची गरज होती पण अशातच महावितरणकडोऔन थकीत वीज बिल भरण्यास सांगितले. हे बील जर भरलं नाही तर वीज कनेक्शन तोडलं जाईल असेही सांगण्यात आलं. वीज बील न भरल्याने कनेक्शन तोडलं गेलं आणि पुन्हा पीक हातातून जाणार हे लक्षात आल्यानंतर वाघमोडेंनी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला.
वाघमोडेंचा लाईव्ह व्हिडीओ गावामधील काही लोकांनी पाहिला. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाघमोडेंना वाचवण्याचा प्रयत्न केला. सध्या त्यांही प्रकृती चिंताजनक आहे. बीड मधील खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. महावितरणाच्या एका कर्मचार्याला कंटाळून त्यांनी विषप्राशन केलं असल्याचा आरोप गावकर्यांनी केला आहे. गावकर्यांकडून महावितरणाच्या त्या कर्मचार्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी महावितरणकडून थकीत वीज बिलापोटी सक्तीची कारवाई करून वीज कनेक्शन खंडीत न करण्याचा आदेश दिलेला असतानाही अनेक ठिकाणी सक्तीची वीज बिल वसुली सुरूच आहे. त्यामुळे अनेकांवर मानसिक ताणासोबतच आर्थिक ताण देखील वाढत आहे.