युवा सेनेचे पदाधिकारी आणि शिर्डी साई संस्थानचे विश्वस्त राहुल कनाल (Rahul Kanal) पाठोपाठ मुंबई मध्ये कॅबिनेट मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचे निकटवर्तीय देखील आयकर विभागाच्या रडार वर आहेत. मुंबई मध्ये संजय कदम (Sanjay Kadam) आणि पुणे आरटीओ चे अधिकारी बजरंग खरमाटे (Bajrang Kharmate) यांच्या घरी देखील आयकर विभागाची छापेमारी सुरू असल्याचं सांगण्यात आले आहे.
दरम्यान विधिमंडळ अधिवेशनासाठी जात असताना आज आदित्य ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया देताना आता निवडणूकीचे पडघम वाजणार आहेत. महाविकास आघाडीला भाजपा घाबरलं आहे. सध्या केंद्रीय यंत्रणांना भाजपा प्रचार यंत्रणा म्हणून वापरत आहे. देशात केंद्रीय यंत्रणांचा त्यांच्याकडून दुरूपयोग करण्याची ही पहिली वेळ नव्हे. यापूर्वी बंगाल, हैदराबाद मध्ये असे प्रयत्न झाले आहेत. पण महाराष्ट्र झुकणार नाही.
किरीट सोमय्या ट्वीट
Income Tax Raids on Rahul Kanal Advisor of Aditya Thackeray, Anil Parab's "Sachin Vaze" Bajarang Kharmate & Finance Partner Sadanand Kadam
आदित्य ठाकरे, अनिल परब यांचे "सचिन वाजे" श्री बजरंग खरमाटे आणि फायनान्स पार्टनर सदानंद कदम यांचे सल्लागार राहुल कानाल यांच्यावर आयकर छापे
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 8, 2022
संजय कदम हे मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय आहेत. आज सकाळी आयकर विभागाने त्यांच्या मुंबईतील अंधेरी येथील घरावर छापा टाकला आहे. संजय कदम हे केबल व्यावसायिक म्हणून काम करतात. तर पुण्यात बजरंग खरमाटे हे आरटीओ अधिकारी आहेत. यापूर्वी मुंबईत मुंबई महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी देखील 4 दिवस धाड टाकण्यात आली होती.