Yavatmal Flood: राज्यात जुलै महिन्याच्या सुरुवाती पासून पावसाने थैमान घातले आहे. राज्यभरात ठिकठिकाणी पावसाने कहर पाहायला मिळत आहे. अतिवृष्टीमुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. पावसाच्या सततच्या धारामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात, गावागावात मुसळधार पावसाने पुर आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पूरामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होत आहे. तर आता दुसरीकडे शेतकऱ्याच्या शेतीचं, शेतमालाचं भरपुर प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटाच्या विखळ्यात अडकला आहे. प्राथमिक अंदाजानुसार यवतमाळ जिल्ह्यातील 2 लाख 37 हजार हेक्टरवरील शेतजमीन आणि पिके बाधित झाली आहेत.
सरकराकडून शेतकऱ्यांना मिळणार मदत
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजारांचे तातडीने अनुदान देण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिले आहेत. तर अर्थमंत्री अजित पवार यांनी पीक नुकसान मदत दुप्पट मणजेच 10 हजार देण्याची घोषणा अधिवेशनात जाहिर केली आहे. यवतमाळ येथील नुकसान झालेल्या शेताचे पंचनामे करण्यास चालू झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 2 लाख 37 हजार हेक्टरवरील शेतजमीन आणि पिके पुरामुळे बाधित झाली आहेत. असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. सरकार कडून मदत कधी पर्यंत मिळेल याकडे साऱ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
राज्यात अनेक दिवसांपासून पावसाने हैरान करुन सोडलं आहे. काही भागात जनजीवन विस्कळीत झाली, तर काही भागात घरांत पाणी शिरलं आहे. तर काही भागातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नागरिकांसोबत शेतकऱ्यांच्या ही चिंता वाढल्या आहे. सरकार मदत करेल याच आशेवर आता शेतकरी जगत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान पाहणीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील पालकमंत्री संजय राठोड करत आहे. दिग्रस,वाई, दारव्हा, येथं पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
आज यवतमाळ जिल्ह्यातील रामगांव (रा) या ठिकाणी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या पाहणी दरम्यान नागरिकांशी संवाद साधला. शासनाच्या वतीने आवश्यक ती मदत तातडीने देण्यात येईल याबाबत त्यांना विश्वास दिला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सूचित करून तातडीने पंचनामे करत… pic.twitter.com/CJLJw6Fep9
— Sanjay Rathod (@SanjayDRathods) July 24, 2023