 
                                                                 सुमारे 150 दिवसांत दोन राज्यांतील, सहा जिल्ह्यांचा प्रवास करीत, यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील (Tipeshwar Wildlife Sanctuary) तीन वर्षांचा सी 1 वाघ (Tiger) बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात (Dnyanganga Wildlife Sanctuary) पोहोचला आहे. या पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये या वाघाने 1300 किमी अंतर कापले आहे. यामुळे यवतमाळ-नांदेड-तेलंगणा-बुलढाणा मार्गे मेळघाटपर्यंत नवीन व्याघ्र कॉरिडोर होण्याची आशा पल्लवित झाली आहे. बुलढाणा शहरापासून 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात, या वाघाला राहण्यासाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. हा वाघ ऑगस्ट आणि सप्टेंबरदरम्यन तो आदिलाबाद आणि नांदेड विभागातील आंतरराज्यीय जंगलात बराच काळ होता.
तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांत या वाघाला राहण्यासाठी अभयारण्यात सुरक्षित जागेची पाहणी केली जाईल. जर इथे सर्व काही त्याच्या सोयीसाठी योग्य असेल तर तो कायम इथे राहू शकतो. हा नर वाघ असल्याने तो नेहमी भटकंती करत असतो. सध्या, तो मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून अवघ्या 50 कि.मी. अंतरावर आहे. ज्ञानगंगा अभयारण्य येथे अस्वलांसोबत इतर विविध प्राण्यांच्या अस्तित्वामुळे हा वाघही येथे राहू शकतो. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात 2016 च्या अंती टीडब्ल्यूएलएस -1 नावाच्या वाघिणीने, सी -1 वाघासह सी -2 आणि सी -3 या तीन वाघांना जन्म दिला. त्यापैकी सी-3 वाघ हा थेट तेलंगणात गेला आणि नंतर टिपेश्वरला येऊन स्थिरावला.
(हेही वाचा: International Tiger Day 2019: का साजरा करतात वाघ दिन? जगापुढे भारताचा आदर्श; घ्या जाणून)
दरम्यान सी -2 वाघ पैनगंगा अभयारण्यात आहे, तर सी -3 ज्ञानगंगा अभयारण्यात पोहोचला आहे. तिन्ही वाघांना 25 ते 27 मार्च 2019 दरम्यान रेडिओ कॉलर लावण्यात आले आहेत. महाराष्ट्र वन विभाग आणि देहरादूनच्या वन्यजीव संस्थाचे तज्ञ पूर्व विदर्भातील व्याघ्र परिभ्रमणावर लक्ष ठेवून आहेत.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
