नाशिक च्या ICICI Home Finance कंपनीच्या कार्यालायातून 5 कोटीचे दागिने चोरांनी लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे नाशिक (Nashik) मध्ये भीतीचं वातावरण आहे. गंगापूर रोड (Gangapur Road) भागामध्ये ही चोरी झाली असून आता शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा उभा ठाकला आहे. चोरांनी वर्दळीचा भाग असलेल्या ठिकाणावरून अतिशय चतुराईने दागिने लुटल्याने आता अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
चोरांनी 222 खातेदारांचे मिळून एकूण 5 कोटीचे दागिने लुटले आहेत. लॉकर्स फोडून ही चोरी झाल्याचं सांगितलं जात आहे. हे चोर पीपीई कीट घालून आल्याचं समोर आलं आहे. दरम्यान सीसीटीव्ही, सिक्युरिटी गार्ड असताना ही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 4 मे रोजी बँकेचे कामकाज बंद झाल्यानंतर लॉकरमध्ये ग्राहकांचे तारण ठेवलेले सोने जमा करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना तेथे आधीच तारण ठेवलेले सोने न मिळाल्याने ही घटना उघडकीस आली. त्यांनी तातडीने ही माहिती संबंधित मॅनेजरला दिली. यानंतर मॅनेजरने लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे तपशील तपासले असता लॉकरमधून 4 कोटी 92 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे आढळून आले. सीसीटीव्ही फूटेज मध्ये केवळ त्यांचे चेहरे दिसत असल्याने पोलिसांना या चोरीचा छडा लावण्याचं मोठं आव्हान आहे.
सुरक्षा रक्षक पुढल्या दरवाज्यावर असताना चोर मागच्या खिडकीमधून पळून गेल्याचा अंदाज आहे. सध्या चोरीचा छडा लावण्यासाठी तपास सरकार वाडा गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे आहे. ही चोरी बॅंक बंद झाल्यानंतर करण्यात आली असून एसी रिपेयर विंडो मधून ते आत असल्याचा संशय आहे. Delhi News: स्वत:च्या आईच्या घरी चोरी, सोन्याचे दागिने चोरले;आरोपी महिलेला अटक .
याप्रकरणी पोलिसांना चोरीत कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांचा हात असण्याची शक्यता वाटत आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी सांगितले की, चोरीच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस लवकरच चोरांना पकडतील.