Divorce on Whatsapp in Nagpur | (Photo courtesy: archived, edited, representative image)

Divorce on Whatsapp in Nagpur: नागपूर येथे कौटुंबीक न्यायालयाने (Family Court Nagpur) अभूतपूर्व पद्धत वापरुन निर्णय देत एका जोडप्याला घटस्फोट (Divorce) घेण्यास मान्यता दिली. न्यायाधीश स्वाती चव्हाण यांनी या खटल्यात काम पाहिले. एका जोडप्याने घटस्फोटाबाबत न्यायालयाकडे मान्यता मागितली होती. मात्र, अडचण अशी होती की, हे जोडप्यातील पत्नी विदेशात होती. त्यामुळे आता आशीलच न्यायालयात नसेल तर, निर्णय द्यायचा कसा आणि सुनावणी घ्यायची कशी? हा प्रश्न निर्माण झाला. पण, न्यायाधीशांनी आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आद्ययावतता दर्शवली. त्यांनी जोडप्याला व्हॉट्सअॅप कॉलिंगच्या माध्यमातून घटस्फोट मंजूर केला. या प्रकरणातील पती नागपूरमध्ये (Husband in Nagpur) होता तर, पत्नी अमेरिकेत (Wife in US).

प्रकरण असे की, खटल्यातील जोडपे मूळचे नागपूरचे.  11 जानेवारी 2013मध्ये दोघेही विवाहबद्ध झाले.महत्त्वाचे म्हणजे दोघांनाही अमेरिकेत नोकरीची संधी मिळाली. दोघेही अमेरिकेत जाऊन राहिले. सगळं कसं नीट चाललं होतं. दरम्यान, पत्नीचा व्हिसा संपला आणि ती भारतात परतली आणि नागपूर येथे सासू सारऱ्यांसोबत राहू लागली. पण, सासूसाऱ्यांसोबत तिचे पटले नाही.त्यांच्यासोबत तिचे खटके उडू लागले. दरम्यान, मिशिगन विद्यापीठात तिला पुढील शिक्षणासाठी तिला संधी मिळाली. ती अमेरिकेला गेली. त्याच काळात पती भारतात आला. दरम्यान, 2017 पासून तिचे पतीसोबतही बिनसले. त्यामुळे दोघांमध्ये कमालीचे अंतर पडले. त्यामुळे दोघांनी नागपूर कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला. (हेही वाचा, हा आहे जगातील सर्वात महागडा घटस्फोट; एका अफेअरमुळे तुटला 25 वर्षांचा संसार)

न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. सर्व कागदपत्रं तपासली. आता शेवटची सुनावणी होणार होती. यात काय तो निर्णय होणार होता. पती न्यायालयात उपस्थित होता. मात्र, पत्नी अमेरिकेतच होती. निर्णय द्यायचा तर दोघेही उपस्थित होते. त्यात अडचण अशी होती की, अमेरिकेतील कायद्यानुसार पत्नी भारतात आली तर पुन्हा तिला अमेरिकेचा व्हिसा मिळणे कठीण होते. पत्नीने कायदेशीर अडचण आपल्या वकिलामार्फत न्यायालयाला सांगितली. न्यायालयाने ही अडचण गांभीर्याने ध्यानात घेत एक आधुनिक पर्याय वापरला. वकिलाच्या मार्फत अमेरिकेत असलेल्या पत्नीला व्हॉट्सअॅप कॉलिंग केले. पती न्यायायालयातच उपस्थित होता. पोटगी आणि इतर काही बाबींबाबत न्यायालयाने दोघांना विचारले. पत-पत्नीने न्यायालायाने उपस्थित केलेले मुद्दे आणि सूचवलेला तोडगा यावर संमती दर्शवली. त्यानंतर न्यायालायने या जोडप्याला घटस्फोटास मान्यता दिली. दोघांना वेगळे होण्यासाठी देशांच्या सीमा त्यांना भेदू शकल्या नाहीत. भारतातील पतीला न्यायालयाने अमेरिकेतील पत्नीपासून घटस्फोट मिळवून दिला. तर, पत्नीलाही पतीपासून वेगळे हेण्यास मान्यता दिली.