Covid-19 संकटात Hindustan Unilever कंपनीकडून 10 कोटीहून अधिक वैद्यकीय संसाधनांची मदत; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले आभार
CM Uddhav Thackeray | (Photo Credits-Twitter)

कोरोना व्हायरस भारतात दाखल झाल्यानंतर हळूहळू विषाणूंनी आपली व्याप्ती वाढवायला सुरुवात केली. त्यानंतर कोविड-19 या विषाणूंचा प्रसार वेगाने होऊ लागला. कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असला तरी इतर अनेक प्रश्न देशासमोर उभे राहिले. त्यामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने देखील 10 कोटीहून अधिक रुपयांची मदत केली आहे. यात 28 हजार 800 टेस्टिंग कीटसह, व्हेटिलेटर्स, पीपीई कीट्स, मास्क, हातमोजे यांचा समावेश आहे. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंपनीचे आभार मानले आहेत.

MAHARASHTRA DGIPR या ट्विटर हँडलवरुन ट्विट करत ही माहिती देण्यात आली आहे. तसंच 10 कोटी रुपयांचे वैद्यकीय संसाधनांची मदत केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कंपनीचे आभार मानले आहेत. (Coronavirus in India: भारतातील कोरोना बाधितांची संख्या 207,615 वर पोहचली; मागील 24 तासांत 8,909 नव्या रुग्णांची भर)

MAHARASHTRA DGIPR Tweet:

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 72300 वर पोहचला असून 31333 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 38493 रुग्णांवर अद्याप उपचार सुरु आहेत. दरम्यान राज्यातील 2465 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने भर पडत आहे. देशभरात लॉकडाऊन 5 सुरु झाला असून अनलॉक 1 च्या माध्यमातून अनेक सेवा-सुविधा सुरु करण्यात येत आहेत.