Coronavirus in India: भारतातील कोरोना बाधितांची संख्या 207,615 वर पोहचली; मागील 24 तासांत 8,909 नव्या रुग्णांची भर
Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

भारतात कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट अधिक दाहक रुप धारण करत आहे. मागील 24 तासांत 8,909 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 217 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 207,615 वर पोहचला आहे. त्यापैकी 100,303 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याात आला आहे. तर 101,497 रुग्णांवर अजूनही उपचार आहेत. दरम्यान 5,815 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health and Family Welfare) दिली आहे.

महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, गुजरात येथे देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या अधिक असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन 5 ची घोषणा करण्यात आली आहे. परंतु, लॉकडाऊनचे निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यात आले आहेत. तसंच अनलॉकच्या माध्यमातून तीन टप्प्यात देशभरातील सेवा-सुविधा सुरु करण्यात येणार आहेत. (Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात तुम्ही राहात असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? पहा आजची कोरोनाबाधितांची जिल्ह्यानिहाय आकडेवारी)

ANI Tweet:

कोरोना व्हायरसला देशभरातील नागरिक सामोरे जात असताना निसर्ग चक्रीवादळाचा धोका भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर घोंगावत आहे. त्यामुळे महाराष्ट्र, गुजरात या किनारपट्टीकडील प्रदेशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसंच नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज असून एनएडीआरएफच्या टीम्स चक्रीवादळाचा धोका असलेल्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत.