Maharashtra Rains: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, काही जिल्ह्यांना Orange, Yellow Alert
Rains | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

विदर्भात काही ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने मुंबई, मुंबई उपनगरं आणि उर्वरीत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलका, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता (, Maharashtra Weather Forecast) आहे. हवामान विभागाने हा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार ही पुढील 24 तास ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. या काळात काही ठिकाणी 15cm किंवा त्यापेक्षा कमी पर्जन्यवृष्टी होऊ शकते असा अंदाज आहे. काही जिल्ह्यांमध्ये यलो (Yellow Alert) तर काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

हवामान विभागाने हवामानाचा अंदाज जारी करताना काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये हिंगोली, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, बुलढाणा, अकोला, वाशिम, उस्मानाबाद, परभणी, भंडारा, गोंदिया आणि कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश आहे. (हेही वाचा, Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात सर्वदूर आज पावसाची शक्यता; पहा मुंबई ते नाशिक मध्ये काय आहे अंदाज)

ठाणे, रायगड जिल्हायत

काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यात नाशिक, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांचा समावेश आहे.

एएनआय ट्विट

हवामान विभागाचे के एस होसाळीकर यांनी महाराष्ट्रातील पर्जन्यवृष्टीबाबत माहिती देताना आगोदरच म्हटले होते की, ''30 ऑगस्ट,कमी दाबाचे क्षेत्र छत्तीससगड वर असून,15° उत्तर वर पूर्व-पश्र्चिम शियर झोन आहे. त्याचा प्रभाव म्हणून, महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे.