Rain | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

महाराष्ट्रात सर्वदूर सध्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई (Mumbai)  सह कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्राच्या अन्य भागांत सध्या पाऊस बरसत आहे. आज वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज (19 ऑगस्ट) महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.आयएमडी मुंबई (IMD Mumbai) कडून वर्तवण्यात आलेल्या आजच्या अंदाजामध्ये अरबी समुद्राच्या उत्तर कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये ढगांची दाटी आहे. त्यामुळे या भागामध्ये पावसाची शक्यता आहे.

कोकणकिनारपट्टीवर पालघर, डहाणू, दमण या भागात पावसाची शक्यता आहे. नाशिक, ठाणे, कल्याण आणि घाट परिसरात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसू शकतो अशी ढगांची स्थिती आहे. तर मुंबई आणि ठाणे भागात अधून मधून पाऊस बरसू शकतो अशी स्थिती असल्याची माहिती देण्यात आली आहे. श्रावण महिना सुरु झाल्यानंतर अशा पावसाच्या सरी पहिल्यांदाच बरसत असल्याने वातावरणामध्ये थंडावा आहे.

मुंबई मध्ये मागील 24 तासांत काही ठिकाणी जोरदार सरी बरसल्या आहेत. कुलाबा मध्ये 52.4 मीमी पाऊस तर सांताक्रुझ मध्ये 42.5 मीमी पाऊस नोंदवला गेला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात या पावसाच्या दिवसात मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये सध्या शेतीच्या कामाला पुन्हा वेग येणार आहे. बळीराजासाठी हा काळ सध्या दिलासादायक आहे.

K S Hosalikar यांचे ट्वीट

दरम्यान मुंबई सह आजुबाजूच्या भागात पावसाच्या अधूममधून जोरदार सरी बरसत असल्याने नागरिकांच्या मागील काही दिवसांतील उन्हाच्या कडाक्यापासून मात्र सुटका झाली आहे.