Chikungunya Cases In Maharashtra: महाराष्ट्रात चिकनगुनियाच्या प्रकरणांमध्ये वाढ, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिल्या सुचना
Health Minister Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात (Maharashtra) चिकुनगुनियाची (Chikungunya) प्रकरणे दुपटीने वाढली असल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी सर्वाधिक रुग्णांचा भार असलेल्या जिल्ह्यांमध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नाशिक, पुणे, बीड, कोल्हापूर यासह इतर जिल्ह्यांमध्ये फील्ड टेहळणी वाढविण्याच्या सूचनाही टोपे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. टोपे यांनी माध्यमांना सांगितले की, राज्यभर सखोल सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 2020 मध्ये साथीच्या आजाराच्या दरम्यान महाराष्ट्रात 782 चिकुनगुनियाच्या रुग्णांची नोंद झाली होती. या वर्षी आतापर्यंत, संख्या आधीच 2000-हून अधिक प्रकरणे ओलांडली आहे.

सार्वजनिक आरोग्य तज्ञांनी या अचानक वाढीचे श्रेय अधूनमधून पडणारा पाऊस आणि कोविड 19 निर्बंध सुलभ झाल्यानंतर लोकांच्या संख्येत झालेली वाढ यांना दिले आहे. 21 ऑक्टोबरपर्यंत, मुंबईत जानेवारीपासून 45 प्रकरणे नोंदली गेली आहेत परंतु बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कडे खाजगी रुग्णालयांचा डेटा नसल्यामुळे एकत्रित आकडा खूपच जास्त आहे. हेही वाचा Mumbai: मालाडमध्ये गाडी अडवल्याने वाहतूक पोलिसांना मारहाण, 2 महिलांवर गुन्हा दाखल

चिकनगुनिया हा एक विषाणूजन्य रोग आहे. जो एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. हा रोग सहसा प्राणघातक नसतो, परंतु सांधेदुखीसह लक्षणे तीव्र आणि दीर्घकाळ टिकणारी असू शकतात. डॉ. प्रदिप आवटे, राज्य निरीक्षण अधिकारी म्हणाले की, दरवर्षी विशेषत: पावसाळ्यात दोन प्रकारचे सर्वेक्षण केले जाते- कीटकशास्त्रीय आणि ताप निरीक्षण.

आमचे क्षेत्र अधिकारी ज्यांना त्यांच्या नियुक्त केलेल्या क्षेत्राच्या लोकसंख्येची माहिती आहे. ते घरी घरी भेट देतात जेथे ते तापाचे निरीक्षण करतात आणि डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे तपासतात. वेक्टर-जनित रोगांसाठी, आम्ही ही प्रक्रिया फॉलो करतो, डॉ. आवटे म्हणाले.

सप्टेंबरच्या अहवालानुसार, सार्वजनिक आरोग्य विभागाने 15 महानगरपालिकांना 200 घरांना भेट देणार आहेत. यासाठी पुढील पाच महिन्यांसाठी डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणांची तपासणी करण्यासाठी तातडीने कर्मचारी नियुक्त करण्याचे निर्देश दिले होते.