GBS Outbreak In Pune: पुण्यातील (Pune) धायरी, किरकटवाडी, नांदेड गाव, नांदेड शहर आणि आंबेगाव यासारख्या भागात गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) चे रुग्ण वाढत आहेत. परिणामी आरोग्य अधिकारी (Health Officer) या आजाराचे संभाव्य स्रोत म्हणून पाण्याचे दूषितीकरण असण्याच्या शक्यतेवर लक्ष केंद्रित करत आहेत. पुणे महानगरपालिका (PMC) नांदेडमधील एका विहिरीतून होणाऱ्या पाणीपुरवठ्याची चौकशी करत आहे. तसेच महानगरपालिका आता या भागांना पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याच्या टँकरची तपासणी करणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रभावित भागातील रहिवाशांकडून मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या खाजगी टँकरची नोंदणी महानगरपालिकेकडे करण्यात आलेली नाही. त्यांची कोणत्याही तपासणी किंवा नियामक उपाययोजना केल्या जात नाहीत. परिणामी, या भागांना वितरित केले जाणारे पाणी आरोग्य आणि सुरक्षिततेच्या मानकांशी जुळते की, नाही याची कोणतीही हमी नाही. या अनियमित वितरण व्यवस्थेमुळे सार्वजनिक आरोग्य प्रतिसादात लक्षणीय तफावत निर्माण झाली आहे. (हेही वाचा - Guillain Barre Syndrome Outbreak Pune: पुणे येथे आढळला दुर्मिळ गुइलेन बॅरे सिंड्रोम, 22 जाणांना बाधा; एका भागात सर्वाधिक रुग्णसंख्या)
सार्वजनिक पाणीपुरवठ्याची चाचणी -
तथापी, या खाजगी पुरवठादारांसाठी योग्य देखरेख किंवा नोंदी नसल्यामुळे, रहिवाशांना ते वापरत असलेले पाणी दूषित आहे की वापरासाठी अयोग्य आहे हे जाणून घेण्याचा कोणताही मार्ग नाही. दरम्यान, आता महानगरपालिका खाजगी टँकरमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याकडे लक्ष देऊन सार्वजनिक पाणीपुरवठ्याची चाचणी आणि देखरेख करण्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणार आहे. (हेही वाचा - Guillain-Barré Syndrome Cases in Pune: पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम या आजाराने वाढवली चिंता, आतापर्यंत आढळले २६ रुग्ण)
पुण्यात गिलेन-बॅरे सिंड्रोमचा प्रादुर्भाव -
पुणे आणि आसपासच्या भागात गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) च्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आतापर्यंत 73 पुष्टी झालेले रुग्ण आढळले आहेत, ज्यात 47 पुरुष आणि 26 महिलांचा समावेश आहे. यापैकी बहुतेक रुग्ण किरकटवाडी, नांदोशी, नांदेड, धायरी आणि सिंहगड रोड येथील आहेत. GBS दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे पसरतो.