Aslam Sheikh (Photo Credit: Twitter)

कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक धार्मिक, सांकृतिक, सामाजिक कार्यक्रमावर निर्बंध लावण्यात आली आहेत. यातच बकरी ईद संदर्भात लवकरच मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines For Bakrid) जाहीर केले जाणार आहेत, अशी माहिती मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Sheikh) यांनी पत्रकारांना दिली आहे. कंटेंन्मेंट झोनमध्ये कुठलेही सण साजरे करण्यास बंदी आहे. महत्वाचे म्हणजे, बकऱ्यांच्या खरेदी विक्रीसाठी राज्य सरकारच्या वतीने ऑनलाईन प्रणाली स्थापन करण्यात येणार आहे. तसेच मार्केट खुल्या मैदानातच लावली जातील, असेही अस्लम शेख म्हणाले आहेत.

"सण आणि उत्सव हे जीवनाचा आनंद वाढविण्यासाठी असतात. आज एकीकडे कोरोनाची साथ झपाट्याने वाढते आहे, ती रोखण्याचे आटोकाट प्रयत्न आपण करीत आहोत आणि आपण त्याला साथ द्यावी असे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले आहे. गेल्या 4 महिन्यांत आपण सर्व धर्मियांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे केले, त्याचप्रमाणे येणारी बकरी ईद देखील साधेपणाने, जमल्यास प्रतिकात्मकरित्या आणि नियमांचे पालन करून साजरी करावी, असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुस्लिम बांधवांना केले आहे. हे देखील वाचा- Bakrid 2020 Simple Mehndi Designs: आपल्या हातावर काढा या नवीनतम आणि आकर्षक मेहंदी डिझाईन्स काढून साजरा करा ईद अल-अधाचा उत्सव, या व्हिडिओ आणि फोटोतून घ्या मदत

ट्वीट-

 

तसेच, भारतात येत्या 1 ऑगस्ट रोजी बकरी ईदचा सण साजरा केला जाणार आहे. बकरी ईद या सणाला ईद उल जुहा असेही म्हणतात. ईद-उल-जुहा हजरत इब्राहिमने केलेल्या त्यागाप्रित्यर्थ साजरा केला जातो. त्यामुळे या दिनाचे प्रतीक म्हणून बक-याचा बळी दिला जातो. मात्र, यामागे एकच उद्देश असतो की, प्रत्येक मनुष्याने आपले जीवन हे ईश्वराची देणगी आहे असे समजावे, त्यामुळे त्याची रक्षा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्याग किंवा बलिदान करण्यासाठी नेहमी तयारी दर्शवली पाहिजे.