चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात तारडा ग्रामपंचायत (Gram Panchayat) आहे. या ग्रामपंचायतीसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. एका गटाला बहुमत मिळाले तर दुसरा गट विरोधी पक्षात राहिला. पण झाली गंमत अशी की सरपंच निवडीवेळी सत्ता आली ती बहुमत असलेल्या गटाची नव्हे. चक्क विरोधी पक्षाची. एकूण सात सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीत अवघ्ये 3 सदस्य असलेल्या गटाचा सरपंच (Sarpanch) झाला आहे. वाटले ना आश्चर्य? घ्या जाणून का आहे चमत्कार कसा घडला प्रकार.
एकूण सात सदस्य संख्या असलेल्या तारडा ग्रामपंचायतसाठी झालेल्या निवडणुकीत एका गटाचे 4 तर दुसऱ्या गटाचे 3 सदस्य निवडूण आले. सहाजिकच 4 सदस्य असलेल्या गटाचा सरपंच होणार. परंतू, विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी बहुमतात असलेले 4 सदस्य गेले पर्यटणाला. इकडे सरपंच पदासाठी अर्ज भरण्याची मुदत आगोदरच जाहीर झाली होती. ठरल्या दिवशी अर्ज भरण्यासाठी बहुमतात असलेले 4 सदस्य परत आले खरे. पण तोवर तिन मिनीटे उशीर झाला होता.
बहुमतात असलेले सदस्य उपस्थित नाहीत हे पाहून विरोधी पक्षात असलेल्या सदस्यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला. इतक्यात बहुमतात असलेले सदस्य कार्यालयात आले. परंतू, निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना घड्याळ दाखवले. या सदस्यांना तीन मिनिटे उशीर झाल्याचे सांगितले. झाले. हातातोंडाशी आलेला घास गेला. (हेही वाचा, Bhadli Budruk Gram Panchayat: भादली बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत इतिहास घडला, तृतीयपंथी उमेदवार अंजली पाटील यांचा विजय)
तीन मिनिटे उशीरा आलेल्या सदस्यांना सरपंच पदाचा अर्ज भरता आला नाही. त्यामुळे वेळेत अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षातील उमेदवाराचा अर्ज वैध ठरवला आणि त्याला सरपंच म्हणून घोषीत केले. प्राप्त माहितीनुसार, सोमावारी (8 फेब्रुवारी) दुपारी 12 पर्यंत सरपंच पदासाठी अर्ज दाखल करायचा होता. मात्र बहुमतात असलेले पॅनल हे अर्ज दाखल करु शकले नाही. ते 12 वाजून 3 मनिटांनी कार्यालयात पोहोचले. विरोधी पक्षात असलेल्या 3 सदस्यांच्या पॅनलने मात्र पले सरपंच-उपसरपंचपदाचे अर्ज वेळेत दाखल केले. त्यामुळे त्यांच्याच गटाचा सरपंच आणि उपसरपंच झाला.