कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचे राज्यावर असलेले सावट अद्यापही कायम आहे. उलट कोरोना व्हायरस प्रादुर्भाव अधिकच वाढत असल्याचे चित्र आहे. अशात रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक होणार की नाही याबाबत संभ्रमावस्था आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 500 ग्रामपंचायतीची मुदत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात संपत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक (Gram Panchayat Election 2020) होणार, मुदतवाढ मिळणार की प्रशासक येणार याबाबत अद्याप उत्सुकता आहे. दरम्यान, निवडणूक उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिशा देसाई यांनी म्हटले आहे की, मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमला जाईल. त्यासाठी जिल्हास्तरावरील निवडणूक विभागाकडून माहिती घेण्यात येत आहे.
निवडणूक उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत प्रशासक नेमणार असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रशासक हा निवडणूक आयोगाच्या नियमानुसार नेमला जातो आणि कामही करतो. मात्र, सोशल मीडियात मात्र प्रशासक हा लोकनियुक्त (थेट जनतेतून) पद्धतीने नेमला जाईल, असा संदेश व्हायरस होताना दिसतो आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. (हेही वाचा, Cantonment Election Act 2007: नाशिक येथील देवळाली कॅन्टोनमेंट यादीतून 11 टक्के मतदारांची नावे वगळली)
कोरोना व्हायरस संकटामुळे राज्यातील विविध निवडणूक रद्द केल्या आहेत किंवा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यतील पुढील ती महिन्यांमध्ये ज्या ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे त्या त्या ठिकाणी प्रशासक नेमण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, प्रशासक नियुक्तीचे अधिकार त्या-त्या तालुक्यातील गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहेत.