महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) कोरोना संसर्गामुळे (Corona Virus) प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना 50,000 रुपये कोविड डेथ कंपेन्सेशन (Covid Death Compensation) मदत रक्कम देण्याची घोषणा केली होती. सरकारच्या या घोषणेनंतर लोकांनी अर्ज पाठवण्यास सुरुवात केली, मात्र आता हे अर्ज सरकारसाठी अडचणीचे ठरले आहेत. वास्तविक, राज्यातील मृत्यूंपेक्षा अधिक अर्ज सरकारकडे भरपाईसाठी येत आहेत. या प्रकरणाबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यात 50 हजारांहून अधिक अर्ज फेटाळण्यात आले आहेत. त्याचबरोबर एक लाख 10 हजार अर्ज सध्या मंजुरीसाठी शिल्लक आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार 18 जानेवारीपर्यंत 2.17 लाख अर्ज आले आहेत. जे राज्यातील मृत्यू प्रकरणांपेक्षा 34 टक्के अधिक आहे.
राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आलेल्या अर्जांपैकी 30 टक्के अर्ज डुप्लिकेट निघाले आहेत. आम्हाला 2.17 लाख अर्ज आले आहेत, याचा अर्थ राज्यात कोरोनामुळे इतक्या लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, असे नाही. उलट भरपाईची रक्कम मिळवण्यासाठी लोक खोटे अर्ज पाठवतात. तसेच, त्यांनी सांगितले की राज्यात आतापर्यंत 1.10 लाख अर्ज स्वीकारले गेले आहेत. यापैकी 1.01 लाख लोकांना आधीच नुकसान भरपाई मिळाली आहे. हेही वाचा Why I Killed Gandhi: अमोल कोल्हे नथुराम गोडसे भूमिका प्रकरणावर शरद पवार यांची प्रतिक्रिया, जयंत पाटील यांनीही स्पष्ट केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका
या प्रकरणाबाबत अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांनुसार सुमारे दीड लाख अर्ज योग्य असल्याचे आढळून आले आहे, जे राज्यातील मृतांच्या संख्येपेक्षा 8 ते 10 हजार अधिक असू शकते. गुरुवारी महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचे 46 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात 46,197 नवीन रुग्णांसह 37 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात संसर्गाची 2,58,569 सक्रिय प्रकरणे आहेत.
मोठ्या संख्येने कोरोना प्रकरणांमध्ये, दिलासा देणारी बातमी अशी आहे की 24 तासात 52,025 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. आकडेवारीनुसार, नवीन रुग्णांमधून 5 हजारांहून अधिक रुग्ण बरेही झाले आहेत. महाराष्ट्रात कोरोनासोबतच ओमिक्रॉनचा धोकाही कमी होताना दिसत नाही. गेल्या 24 तासांत, नवीन प्रकाराची लागण झालेले 125 रुग्ण आढळून आले आहेत.