
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ (Why I Killed Gandhi) चित्रपटात केलेली नथूराम गोडसे (Nathuram Godse) याच्या भूमिकेवरुन वाद निर्माण झाला आहे. या वादावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्याही कलाकारने एखादी भूमिका केली तर ती तो कलाकार असतो. याचा अर्थ तो त्या व्यक्तीच्या विचारांचा समर्थक असतोच असे नाही. कोणत्याही चित्रपटात कलाकार एखादी भूमिका करत असेल तर कलाकार म्हणूनच त्याच्याकडे पहावं लागेल. गांधी सिनेमा संपूर्ण जगात गाजला होता. त्या चित्रपटातही कोणीतरी नथुराम गोडसेची भूमिका केली होती. ती भूमिका ज्याने केली तो कलाकार होता, तो काही नथुराम गोडसे नव्हता', असे म्हणत शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच, अमोल कोल्हे यांचे समर्थनही केले आहे.
जयंत पाटील यांनीही प्रसारमाध्यमांसमोर राष्ट्रवदी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. महात्मा गांधी यांच्या हत्येचे कोणीही समर्थन करणार नाही. परंतू, अमोल कोल्हे यांनी एक कलाकार म्हणून जर महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याची भूमिका केली असेल तर त्यांना त्या विचारधारेशी सहमत असणे समजू नये. कलाकार हा कलाकार असतो. तो कलाकार म्हणून एखादी भूमिका करत असतो. त्यामुळे त्याला त्या व्यक्तीरेखेतून पाहू नये. एखाद्याने जर खलनायकाची भूमिका केली तर ती व्यक्ती खलनायक ठरत नसते, असे जयंत पाटील म्हणाले. दरम्यान, नथूराम गोडसे याच्या विचाराचे अथवा त्याचे उदात्तीकरण केले जाणार नाही. केले जाऊ नये होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच अग्रही राहिली आहे. त्यामुळे नथूराम गोडसे यांच्या विचारांना पक्षाचा विरोध नक्कीच आहे, असेही जयंत पाटी म्हणाले.
दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे की, या चित्रपटाचे चित्रिकरण 2017 मध्येच झाले होते. तेव्हा मी सक्रीय राजकारणात नव्हतो. तसेच, आपण एखादी भूमिका साकारतो म्हणून ती भूमिका वैचारिक पातळीवर स्वीकारली असे होत नाही. काही वेळा आपण एखाद्या विचारांशी, भूमिकेशी सहमत नसतो. मात्र, त्या भूमिका आव्हानात्मक असतात. त्यामुळे कलाकार ती भूमिका करत असतो. मुळात मी माझ्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यात नधुराम गोडसेंच्या उदात्तीकरणासंदर्भात किंवा गांधीहत्येच्या समर्थनार्थ कधीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे त्या भूमिकाचा संबंध राजकीय विचारांशी जोडू नये, असे अवाहन डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे. (हेही वाचा, Why I Killed Gandhi: नथूराम गोडसे याच्या भूमिकेत डॉ अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाडांपासून अनेकांचा विरोध; जोरदार टीका)
जितेंद्र आव्हाड यांचा विरोध
डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही. विनय आपटे-शरद पोंक्षे ह्यांना ह्या भूमिके बद्दल महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेनी प्रचंड विरोध केली त्यामुळे त्याच भूमिकेबरोबर राहून ह्या गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार