FSSAI On Unsafe Protein Powders: देशभरामध्ये पूरक अहार पदार्थ आणि प्राटीन पावडर (Protein Powders) म्हणून विक्री होणाऱ्या विविध नमुन्यांवर केंद्र सरकारने जोरदार कारवाई केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सन 2022-23 मध्ये मानवी आरोग्यासाठी असुरक्षित असलेली उत्पादने विक्रीची तब्बल 40,000 प्रकरणे उघडकीस आली. या सर्व प्रकरणांमध्ये अनेन आणि सुरक्षा मानकांची कोणत्याही प्रकारची पूर्तता केली जात नसतानाही ही उत्पादने विक्री केली जात होती.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सांगितले की, देशात असुरक्षित आहार पूरक आणि प्रथिने पावडरच्या विक्रीविरोधात सरकारने कठोर कारवाई केली आहे. ही कारवाई बाजारात प्रथिने पावडर आणि आहारातील पूरक पदार्थांची विक्री करताना असुरक्षित उत्पादने विकणाऱ्या व्यक्ती/कंपन्यांवर करण्यात आली आहे. जी आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) द्वारा करण्यात आली.
आरोग्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरात पुढे सांगितले की, सन 2022-23 मध्ये असुरक्षीत प्रथिने भुकटी (प्रोटीन पावडर) विक्रीची 38,053 दिवाणी प्रकरणे दाखल झाली. तसेच, 4,817 प्रकरणे ही अद्याप पुष्टी न झालेल्या नमुन्यांची आहेत. सन 2021-22 च्या तुलनेत ही प्रकरणे 28,906 नी वाढली आहेत.
प्रथिनांची भुकटी आणि आहारातील पूर आहार म्हणून विक्री होणाऱ्या अन्न पदार्थांच्या विश्लेषणासाठी उत्पादनांचे नमुने FSSAI द्वारे मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये पाठवले जातात. जे उत्पादक FSSAI च्या अन्न सुरक्षा मानकांचे पालन करत नाहीत किंवा त्यांची उत्पादने सदोष आढळतात त्यांच्यावर कडक कारवाई केली जाते. कधी ही करवाई दंडात्मक असते कधी काही प्रकरणामध्ये न्यायालयीने शिक्षाही होते, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
FSSAI काय आहे?
FSSAI म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी ही एक वैधानिक संस्था आहे. FSSAI ची स्थापना अन्न सुरक्षा आणि मानक अधिनियम, 2006 अंतर्गत करण्यात आली होती. FSSAI चे उद्दिष्ट अन्न सुरक्षेवर योग्य नियम आणि पर्यवेक्षणासह सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण आणि प्रोत्साहन देणे आहे.
FSSAI चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. त्याची दिल्ली, गुवाहाटी, मुंबई, कोलकाता, कोचीन आणि चेन्नई येथे सहा प्रादेशिक कार्यालये आहेत. संपूर्ण भारतात 14 रेफरल प्रयोगशाळा, 72 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रयोगशाळा आहेत आणि नॅशनल अॅक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज (NABL) द्वारे मान्यताप्राप्त 112 खाजगी प्रयोगशाळा आहेत. वाचकांच्या माहितीसाठी असे की, प्रयोगशाळांची इथे दिलेली माहिती उपलब्ध माहितीवरुन आहेत.