महाराष्ट्राचे (Maharashtra) राजकारण पेटले असून मुख्यमंत्रीपदावरुन भाजप-शिवसेना (BJP-ShivSena) यांच्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. यातच शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषेद घेऊन भाजपवर शाब्दीक हल्ला चढवला आहे. तसेच महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार स्वत: ही गोड बातमी घेऊन येतील, असे संजय राऊत म्हणाले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी अडीच वर्षे भाजपचा तर, अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार अशी दोन्ही पक्षात बोलणी झाली होती. मात्र, भाजपने शिवसेनेला असा कोणताच शब्द दिला नव्हता, असे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या विधानानंतर युतीत अधिकच वाद पेटत गेला.
महाराष्ट्र विधासभा निवडणुकीच्या निकाल लागून १४ दिवस उलटले तरीदेखील राज्यात अजूनही सत्ता स्थापन झाली नाही. या निवडणुकीत महायुतीला अधिक जागा मिळाल्या असल्या तरीदेखील मुंख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षात वाद सुरु झाला आहे. यातच संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषेद घेऊन भाजपवर टोला लगावला आहे. मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार स्वत: ही गोड बातमी घेऊन येतील असा, विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना पक्ष आणि भाजप यांच्यात वैयक्तिक वाद नसून भाजपने दिलेला शब्द पाळावा. त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांनी राज्यात फोडाफोडीचे राजकारणाला सुरुवात केली आहे. परंतु, शिवसेनेच्या आमदारांना फोडणे अशक्य आहे, असेही संजय राऊत म्हणाले आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आज अत्यंत महत्वाचा दिवस; शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या खास भेटी
एएनआयचे ट्वीट-
Sanjay Raut,Shiv Sena: The Chief Minister will be from Shiv Sena. https://t.co/ebV8TSny18 pic.twitter.com/HjNfeAKvrG
— ANI (@ANI) November 7, 2019
महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी दोन्ही पक्षाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, शिवसेना पक्षाकडून संजय राऊत यांनी आक्रमक भुमिका घेतली असून मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असा त्यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार असल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रात कोणाची सत्ता स्थापन होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.