Mumbai News: सोनं खरेदीसाठी (Gold Shopping) सर्वत्र सग्राहकांची तुंबड गर्दी पाहायला मिळत आहे. सराफ बाजारात दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ग्राहकांची लगबग सुरुच आहे. लक्ष्मीपूजनापर्यंत सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीने 1200 ते 1500 कोटींची खरेदी झाल्याची माहिती समोर आली आहे. दिवाळीनंतर लगेच लग्नमुहुर्त असल्यामुळे सोने चांदीची खरेदी केली जात आहे. तर पाडवा आणि भाऊबीजेपर्यंत खरेदी विक्रीच्या व्यवहारांत 500 ते 700 कोटींची भर पडेल, असा अंदाज सराफ बाजाराने व्यक्त केला आहे.
लक्ष्मीपूजनच्या दिवशी ग्राहकांनी रांगा लावून सोने खरेदी केली आहे. सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळता आहे. धनत्रयोदसी ते भाऊबीज या दिवसांत सराफ बाजारात दागिने घेण्यासाठी धूम असते. माहितीनुसार सोन्याच्या भावात चढ उतार दिसणार आहे. आज पाडव्यानिमित्त सोन्याचा भाव प्रतितोळा ५६ हजार ५०० हजार रुपये एवढा आहे. लग्नसराई सुरु असल्याने सोन्याच्या खरेदी वाढ होणार आहे.
लक्ष्मीपूजन निमित्त चांदीच्या नाण्यांची खरेदी सर्वात जास्त झाल्याचे दिसले. सोबत मंगळसुत्र, बांगड्या, चैनी, कानातले असे दागिने घेण्यास ग्राहकांनी ताव मारला. पाडव्याला मुंबई शहरात ५०० ते ७०० कोटी रुपयांची सोन्या चांदीची उलाढाल होईल असं जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्सचे संस्थापद आनंद जगन्नाथ पेडणेकर यांनी सांगितले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ९ ते १० टक्के अधिक उलाढाल वाढण्याची शक्यता आहे.