Dhanteras 2023, Gold Prices: धनत्रयोदशी सोने खरेदी, जाणून घ्या पिवळ्या धातूचा दर, करा दिवाळी सोनेरी
Jewellery (Photo Credits: Pixabay)

दिवाळी सणाचा उत्साह आणि सोने खरेदी (Diwali Gold Buying Muhurat) हे पूर्वंपार चालत आलेले समिकरण. खास करुन अनेकांची धनत्रयोदशी सूवर्ण खरेदी झाल्याशिवाय पूर्णच होत नाही. भारतीय संस्कृती, परंपारा आणि पंचांग मानणारे लोक मुहूर्ताला विशेष महत्त्व देतात. सहाजिकच धनतेरस सोने खरेदी (Dhanteras 2023 Gold Prices) मुहूर्तही पाहिले जातात. पण केवळ मुहूर्त माहिती असून उपयोग नाही. सूवर्ण खरेदी वेळी त्याचे दरही माहिती असणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच जाणून घ्या जगात सर्वाधिक किमतीला विकल्या जाणाऱ्या काही दुर्मिळ धातूंपैकी एक असलेला हा पिवळा धातू (Yellow Metal Rate in Todays) आज (10 नव्हेंबर) किती रुपयांना विकला जातो आहे. सांगितले जात आहे की, देशभरात प्रति 10 ग्रॅम सोने 63,000-68,000 रुपयांना विकले जात आहे. इथे आपण जाणून घेऊ शकता महाराष्ट्रात सोने-चांदी दर काय आहेत.

मुंबई शहरात सोने विक्री साठीपार

देशासह अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या आणि आंतरराष्ट्रीय शहर असलेल्या मायावी मुंबई शहरहात धनत्रयोदशी दिवशी सोने दर काहीसे चढे पाहायला मिळत आहे. 22 कॅरेट सोने प्रति तोळा म्हणजेच 10 ग्रॅम 56,000 रुपये दराने विकले जात आहे. कालच्या तुनलेत आज जवळपास 300 रुपयांनी हे दर वाढले आहेत. हेच सोने काल 55,700 रुपयांना विकले जात होते. दुसऱ्या बाजूला याच शहरा 24 ग्रॅम प्रति तोळा म्हणजेच 10 ग्रॅम सोने 61,090 रुपयांना विकले जात आहे. कालच्या तुलनेत 24 कॅरेट सोन्यातही 330 रुपयांची वाढ झाली आहे.

महाराष्ट्रातील विविध शहरांतील सोने दर

पुणे

24 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम)- 61,090 रुपये

22 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम)- 56,000 रुपये

नागपूर

24 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम)- 61,140 रुपये

22 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम)- 56,000 रुपये

नाशिक

24 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम)- 61,140 रुपये

22 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम)- 56,030 रुपये

अमरावती

24 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम)- 61,090 रुपये

22 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम)- 56,000 रुपये

वसई-विरार

24 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम)- 61,090 रुपये

22 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम)- 56,000 रुपये

कोल्हापूर

24 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम)- 61,090 रुपये

22 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम)- 56,000 रुपये

लातूर

24 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम)- 61,140 रुपये

22 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम)- 56,030रुपये

ठाणे

24 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम)- 61,090 रुपये

22 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम)- 56,000 रुपये

वाचकांसाठी सूचना अशी की, इथे दिलेले सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात GST, TCS आणि इतर शुल्क समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी आपणआपल्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधू शकता. इथे दिलेले सर्व दर गुडरिटर्न्स वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार आहेत. अधिक माहितीसाठी आपण आपल्या स्थानिक सोनार, पेढी आणि आर्थिक सल्लागाराची मदत घेऊ शकता.