GI Tags Maharashtra: 'चिंच','ज्वारी', 'कोथिंबीर' यांसह महाराष्ट्राला नऊ 'भौगोलिक मानांकन'; घ्या जाणून
Tamarind | Representational image (Photo Credits: pixabay)

GI Tag Certification: राज्यांमध्ये असलेल्या विशेष बाबींसाठी देणयात येणाऱ्या 'भौगोलिक मानांकना'मध्ये (GI Tags Maharashtra) महाराष्ट्रातील नऊ बाबींचा समावेश झाला आहे. ज्यामध्ये बदलापूर येथील 'बाहडोळी जांभूळ', पेणच्या प्रसिद्ध 'गणेशमूर्ती', लातूर जिल्ह्यातील कास्ती येथे पिकणारी 'कोथिंबीर', निलंगा तालुक्यातील आढळणारी पानचिंचोली येथील 'चिंच' (Tamarind), बोरसुरी येथील 'तूर', जालन्याची 'दगडी ज्वारी' (Sorghum), धाराशीव येथील 'कुंथलगिरी खवा', तुळजापूरची 'कवडी' आदी बाबींना हे मानांकन मिळाले आहे.

राज्यातील विशेष बाबींना 'भौगोलिक मानांकन' मिळावे यासाठी महाराष्ट्राकडून 18 प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यापैकी 50% म्हणजेच नऊ बाबींना हे मानांकन मिळाले आहे. (हेही वाचा, अलिबागच्या पांढर्‍या कांद्याला मिळाला GI Tag)

कोणकोणत्या बाबींना मिळाला GI Tags? 

  • बदलापूर- 'बाहडोळी जांभूळ'
  • पेण- 'गणेशमूर्ती'
  • लातूर- कास्ती 'कोथिंबीर'
  • निलंगा- पानचिंचोली येथील 'चिंच'
  • बोरसुरी- 'तूर'
  • जालना- 'दगडी ज्वारी'
  • धाराशीव -'कुंथलगिरी खवा'
  • तुळजापूर- 'कवडी'

भौगोलिक नामांकन म्हणजे काय?

भौगोलिक नामांकने (GI) विशिष्ट उत्पादनांशी संबंधित नाव किंवा चिन्हाचा संदर्भ देते. जे शहर, प्रदेश किंवा देश यासारख्या विशिष्ट भौगोलिक स्थानावर त्यांचे मूळ सूचित करते. भौगोलिक संकेत नियुक्त करण्याचा उद्देश उत्पादनामध्ये विशिष्ट गुणधर्म आहेत, पारंपारिक उत्पादन पद्धतींचे पालन करते किंवा त्याच्या भौगोलिक उत्पत्तीमुळे महत्त्व आहे हे मान्य करणे हा आहे.

GI टॅगचे महत्त्व

GI टॅगचे महत्त्व हे काही अधिकार प्रदान करण्याच्या क्षमतेमध्ये आहे. यामध्ये तृतीय पक्षांची उत्पादने निर्दिष्ट मानकांची पूर्तता करत नसल्यास त्यांना GI वापरण्यापासून प्रतिबंधित करण्याचा अधिकार समाविष्ट आहे. उदाहरणार्थ, दार्जिलिंग भौगोलिक संकेताच्या संरक्षित व्याप्तीमध्ये, दार्जिलिंग चहाच्या उत्पादकांना त्यांच्या नियुक्त केलेल्या चहाच्या बागांमध्ये लागवड न केलेल्या किंवा त्यामध्ये नमूद केलेल्या प्रस्थापित मानदंडांनुसार उत्पादित न केलेल्या चहासाठी "दार्जिलिंग" शब्दाचा वापर प्रतिबंधित करण्याचा अधिकार आहे.

महाराष्ट्राला अशा प्रकारे मिळालेल्या भौगोलिक मानांकनामुळे राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. अशा प्रकारचे मानांकन कोणत्याही राज्यासाठी भूषणावह असते. ज्यामुळ राज्याच्या परंपरा, अभिमानास्पद गोष्टी, इतिहास, परंपरा, संकेत यांची पुष्टी होते. तसेच, विशिष्ट बाबींवरुन निर्माण झालेला किंवा होऊ घातलेला संभाव्य वादही संपुष्टात येतो. अलिकडील काही काळात भौगोलिक मानांकनावरुन राज्या राज्यांमध्ये वादही निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. जसे की, 'रसगुल्ला' पदार्थावरुन पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यात निर्मण झालेला वाद अगदी अलिकडील काळातील आहे. इतरही अनेक मानांकनांवरुन राज्ये परस्परांशी भांडताना दिसतात.